viral news  Saam v
व्हायरल न्यूज

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

viral news : आता 200 रुपयांच्या नोटेवर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा फोटो छापणार असल्याचा दावा करण्यात आलाय...नोट कशी आहे याचाही फोटो व्हायरल केलाय...पण, खरंच 200 रुपयांच्या नोटेवरून गांधींना हटवण्यात आलंय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

200 रुपयांच्या नोटेवर आता अब्दुल कलाम यांचा फोटो छापला जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय...200 रुपयांची ही नवीन नोट चलनात येणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच नोटेवरून गांधींजींचा फोटो हटवला जाणार आहे का...? खरंच सरकारने आणि आरबीआयने असा निर्णय घेतलाय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

200 रुपयांची नवीन नोट येणार आहे. या फोटोवर अब्दुल कलाम यांचा फोटो असेल, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा मेसेज आणि नोटेचा फोटो व्हायरल होतोय...त्यामुळे आता अनेकांना हाच प्रश्न पडलाय की गांधींचा फोटो का हटवला जातोय...अब्दुल कलामांचा फोटो नोटेवर येणार असेल तर याची माहिती आधी देण्यात आलीय का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने याची आम्ही पडताळणी सुरू केली...गांधींचा फोटो हटवून कलाम यांचा फोटो नोटेवर छापण्यामागचं काय कारण आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत आम्ही आरबीआय, सरकार आणि तज्ज्ञांकडूनही याबाबत माहिती घेतली...

त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

साम इन्व्हिस्टिगेशन

200 च्या नोटेचा व्हायरल फोटो बनावट

200 च्या नवीन नोटेवर अब्दुल कलामांचा फोटो नाही

लोकांची दिशाभूल करण्यासाठी फोटो व्हायरल

नोटांवरील गांधींजींचा फोटो हटवलेला नाही

नवीन चलन येणार असेल आणि त्यात काही बदल असतील तर त्याची माहिती आधी आरबीआयकडून दिली जाते...सरकारही माहिती देतं...अचानक असा निर्णय घेतला जात नाही...हा फोटो लोकांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल करण्यात आलाय...त्यामुळे आमच्या पडताळणीत 200 च्या नोटेवर अब्दुल कलामांचा फोटो छापणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT