Elephant Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

Elephant Viral Video : झारखंडमधील रामगढ येथे हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न तरुणाच्या जीवावर बेतला. व्हायरल व्हिडिओत हत्तीचा हल्ला दिसून येतो.

Alisha Khedekar

  • हत्तीसोबत सेल्फी घेणं ठरलं जीवघेणं

  • हत्तीने तरुणाला पायाखाली तुडवून ठार केलं

  • नंतर सोंडेने उचलून जमिनीवर आपटलं

  • थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

प्राणी कितीही आकाराने मोठे असले किंवा चेहऱ्यावरून आक्रमक वाटत असले तरी काही प्राणी हे निरागस असतात. त्यांना कोणी त्रास दिला तरच ते एखाद्यावर हल्ला करतात. अशीच एक घटना व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. रस्त्यावरून चालत असलेल्या नागरिकांना हत्ती सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. मात्र सेल्फी काढत असतानाचं हत्तीने त्यांना पायाखाली तुडवल्याचं पाहायला मिळालं आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ झारखंडमधील रामगढ या ठिकाणाचा आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावरून चालताना एक तरुण हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी गेला. सेल्फी काढत असताना हत्ती त्याच्या मागे धूम ठोकून धावू लागला. या दरम्यान हत्तीच्या पायाखाली एक तरुण आल्याचं पाहायला मिळतं आहे. परिणामी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हत्ती त्यानंतरही थांबला नाही. त्याने सोंडेनं तरुणाचं शरीर उचलून जमिनीवर आपटलं.

हा व्हिडिओ @iamnarendranath या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पहिला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी सेल्फी घेणाऱ्या लोकांवर टीका केली आहे, तर काहींनी हत्तीने केलेले कृत्य योग्य असल्याचे सांगत त्याचं समर्थन केले आहे.

मात्र ही घटना दुर्दैवी आहे, पण प्राण्यांना त्यांच्या आयुष्यात उगाच कोणीही अडथळा निर्माण केलेला आवडत नाही. त्यांना जसं हवं तसचं ते जगतत्. उगाच त्यांना छेडण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा असे प्रकार घडतात. यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT