व्हायरल न्यूज

Latur : लातूरमध्ये गतीमंद विद्यार्थ्याला फळी तुटेपर्यंत मारलं; शिक्षकाच्या क्रूरतेचा Video व्हायरल

Latur News : लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील गतीमंद विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला फळी तुटेपर्यंत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चौकशीची मागणी होत आहे.

Alisha Khedekar

  • लातूरमध्ये गतीमंद विद्यार्थ्याला मारहाण

  • शिक्षकाने लाकडी फळीने बेदम मारहाण केली

  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल

  • पालकांमध्ये संताप

  • शाळेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

संदीप भोसले, लातूर

Latur Sant Dnyaneshwar School Viral Video News शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचं दुसरं घर आणि शिक्षक म्हणजे गुरु. मात्र याच शाळेत मुलांना अमानवी वर्तवणूक मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. लातूरच्या एका गतीमंद विद्यार्थ्यांच्या शाळेतील एका विद्यर्थ्याला फळी तुटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील, संत ज्ञानेश्वर निवासी गतीमंद विद्यार्थ्यांच्या विद्यालयात हा प्रकार घडला आहे. या विद्यालयातील शिक्षकाने एका गतीमंद मुलाला फळी तुटेपर्यंत बेदम मारहाण केली. मात्र त्याने का मारहाण केली हे अद्याप समोर आलेलं नसून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, विद्यालयातील एका शिक्षकाच्या हातात लाकडी फळी दिसत आहे. त्याच लाकडी फळीने शिक्षकाने मुलाला बेदम मारहाण केली पाहायला मिळत आहे. शिक्षकाच्या मारण्याने व्हिडिओतील मुलगा मोठं मोठ्याने ओरडताना दिसतो आहे. त्यानंतर शाळेतील काही शिक्षकांनी त्याला शांत करत घटनास्थळावरुन घेऊन गेल्याच व्हिडिओमध्ये कैद झालं आहे.

दरम्यान या मुलाला मारहाण का केली ? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. शिक्षकाच्या या अमानुष कृत्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्या शाळेच्या सुरक्षिततेच्या विश्वासावर पालक मुलांना बिनधास्त सोडतात, त्याच शाळेत शिक्षकांची दमदाटी मुलांच्या जीवावर बेतू शकते. याप्रकरणानंतर आता पालकांनी शिक्षकाची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan: गणपती चालले गावाला...; मुंबई- पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरूच, बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी

Maharashtra News Live Update: जुहू समुद्रकिनारी गणेश भक्तांची गर्दी, सुलभ शौचालय चालकाकडून भाविकांची लूट

Rain Alert : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, 'या' १२ राज्यांना सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा

Weight Loss : चपाती की भात कशामुळे लवकर वजन वाढत? डॉक्टरसुद्धा करतात अलर्ट

Saturday Horoscope : कसलाही ताण घेऊ नये! पैशाची तंगी जाणवणार नाही, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT