Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मेट्रोमध्ये पुन्हा राडा! काकांनी सुपरमॅन स्टाईलने हाणला बुक्का, सह प्रवाशाला धु धु धुतलं, VIDEO तुफान व्हायरल

Kolkata Metro Video: आजवर आपण दिल्ली मेट्रोतील अनेक अतरंगी व्हिडिओ पाहिले असेल. मात्र सध्या कोलकतामधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो एका मेट्रोमधील हाणामारीचा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेट्रोचे नाव काढता भाडंण- तंटा या गोष्टींची आठवण येते. दिल्ली मेट्रो असो वा मुंबई मेट्रो आजवर मेट्रोमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. कधी कपलची हाणामारी तर याच कपलचा रोमान्स शिवाय प्रवाशांची हाणामारी, असे अनेक व्हिडिओ मेट्रोमधील व्हायरल झालेले आहेत. मात्र सोशल मीडियावर पुन्हा एका मेट्रोमधील तूफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात प्रवाशांनी एकमेंकाना तूफान तुटवल आहे.

काय घडले?

व्हायरल (Viral) व्हिडिओत तुम्हाला मेट्रोमधील आतमधील बाजू दिसत आहे. जिथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची तूफान गर्दी आहे. यामध्ये अनेक महिला आणि पुरुष प्रवाशी आहेत. मात्र व्हिडिओत पुढे एक व्यक्ती आहे जो दुसऱ्या व्यक्तीला जोरजोरात मारताना दिसत आहे. यात एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तील हाताचा बुक्काच चेहऱ्यावर मारला आहे. या व्यक्तीला इतर प्रवाशी अडवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तो व्यक्ती रागात दिसून येतोय. व्हिडिओ हाणामारी करणारा व्यक्ती थांबतो आणि स्टेशन (station) येताच मेट्रोमधून(Metro) बाहेर जाताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. १३ सप्टेंबर रोजी व्हिडिओ शेअर करताच काही दिवसांतच व्हिडिओ ९८ हजार नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर अनेकांनी व्हिडिओला पसंतीही दिलेली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच ''पुश अँड शॉववर दोन काकांची कोलकाता मेट्रोच्या आत हाणामारी'' असे कॅप्शन व्हिडिओला दिलेले आहे. मात्र मेट्रोमधील हाणामारीचे नेमके कारण काय ते समजू शकलेले नाही.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील नसून कोलकता मेट्रोमधील आहे. जिथे काही कारणास्तव दोन पुरुषांमध्ये हाणामारी झालेली आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांच्या एवढ्या पसंतीस आलेला आहे की, नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,''शेवटी दिल्ली ऐवजी माझ्या शहरातून नवी मेट्रो कलेश व्हिडिओ पाहिला'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मेट्रो प्रवासाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीसाठी आहे''. तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काकांसाठी शाही खुर्चीची व्यवस्था करावी''. अशा गंमतशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT