Smoking In Delhi Metro saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : 'बीड़ी जलाई ले दिल्ली मेट्रो मा'; काकांनी धावत्या मेट्रोत पेटवली बिडी अन्...

Delhi Metro video : धावत्या मेट्रोमध्ये काकांनी बिडी पेटवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वणवा पेटल्याप्रमाणे व्हायरल झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Smoking In Delhi Metro :

दिल्ली मेट्रो गेल्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे चर्चेत असते. मेट्रोमधील व्हायरल (Viral Video) होणारे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोके चक्रावत असतात. सध्या असाच एक दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ वणवा पेटल्याप्रमाणे व्हायरल होत आहे. यामध्ये काकानं धावत्या मेट्रोमध्ये सर्वांना अडचणीत टाकलं. काकांनी धावत्या मेट्रोमध्ये बिडी पेटवल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. (Latest viral News)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्तीने सीटवर बसल्यानंतर फूल स्वॅगमध्ये खिश्यातून बिडी काढली आणि आगपेटीच्या काडीने ती बिडी पेटवली. बिडी पेटल्यानंतर काकांनी आगपेटीची काडी तेथेच फेकून दिली. काकांच्या आजूबाजुला प्रवाशी आहेत, तरीही काकांनी स्वॅगमध्ये बिडी ओढली. सार्वजनिक ठिकाणी बिडी पेटवल्याबद्दल इतर प्रवाशांनी काकांना टोकलं. माझ्याकडे तिकीट आहे, असं उत्तर या काकांनी दिलं. दरम्यान सोशल मीडिया हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो अधिकाऱ्यांकडून उत्तर मागितले आहे.

परंतु डीएमआरसी आणि इतर अधिकार्‍यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. अशा घटनेमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने अशा व्यक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर आता डीएमआरसी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कपल सर्वांसमोर किसिंग करताना दिसत आहेत.

मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक कपल एकमेकांच्या अगदी जवळ मिठीत असताना दिसून येतं आहेत. ते फक्त एकमेकांना मिठी मारत नाही तर ते सार्वजनिक ठिकाणी किस करत होते. त्यामुळे मेट्रोमधील प्रवाशी लाजल्यात जमा झाले. हा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत असून लोकांनी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Bread Custard Pudding: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा घरीच बनवा टेस्टी ब्रेड कस्टर्ड पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

युद्धाचा परिणाम IPL स्पर्धेवर, रद्द होणार की स्थगित? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT