Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: टेम्पोच्या धडकेत अल्पवयीन मुलगा ठार, डोंबिवलीतील घटना; मृत्यूचा थरार CCTVत कैद

Cctv Footage Video: सोशल मीडियावर सध्या डोबिंवलीतील एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात घडलेला अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

दरदिवशी कारच्या धडकेत झालेले अनेक अपघात आपल्याला कानावर ऐकण्यास येत असतात. कधी व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे अनेक थरारक अपघात झालेले आहेत तर वाहनांच्या अति वेगाने काही अपघात घडतात. सध्या सोशल मीडियावर डोंबिवली घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सर्वत्र चर्चेत आलेला आहे. ज्या घटनेत भरधाव टेम्पोच्या धडकेत एका मुलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झालेला आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ वाहनांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. मात्र तुम्ही रस्त्याच्या एका बाजूला पाहिला तर एक भरधाव वेगात टेम्पो येत आहे, अशात या टेम्पोच्या पुढे दोन तरुण दुचाकी वरून जात असतात, मात्र भरधाव टेम्पोचे वेगावरचे नियंत्रण सुटते आणि दुचाकीवरुन टेम्पो जातो. ज्यात दुचाकीवरुन एक तरुण जागीच ठार होतो. सर्व घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेली आहे.

संपूर्ण अपघाताची घटना डोंबिवली पूर्वेकडील मिलाप नगर कावेरी चौकातील आहे. सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडिओ एक्सवरील ''@TanviPol116027'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

रेकॉर्डब्रेक मतदान! पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के व्होटिंग; सत्ता बदलणार की ममता बॅनर्जी पुन्हा येणार?

Baramati Politics: 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत होणार? रोहित पवारांच्या विधानावर जय पवारांचं स्पष्ट शब्दात उत्तर

मनातल्या इच्छा अपूर्ण राहतील, विवाहित लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतील; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार ठरणार आव्हानात्मक

SCROLL FOR NEXT