Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आजीबाईचा स्वॅग लय भारी! नातीच्या वरातीत ठसकेबाज डान्स; VIDEO पाहताच नेटकरी थक्क

Dance Video: सोशल मीडिया सध्या एका आजींच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात आजींचा धम्माकेदार डान्स आपल्याला पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक डान्सचे व्हिडिओ आपण पाहत असतो.कधी लहान मुलांचा अनोखा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतो तर अनेकदा वृद्ध व्यक्तींचा लग्नाच्या वरातीत घातलेला धिंगाना असो. सध्या सोशल मीडियावर असाच एका डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात नातीच्या वरातीत एका आजींचा जबरदस्त डान्स व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला रात्रीच्या वेळी सुरु असलेली लग्नाची वरात दिसून येत आहे. सुरु असलेली वरात नवरी मुलीची असल्याचे समजते. एका बाजूला मोठ्या आवाजात डीजे सुरु आहे तर डीजेच्या समोर अनेक महिलावर्ग डिजेच्या तालावर डान्स करत आहेत. या महिलावर्गात महिलासह नवरी मुलगी तुम्हाला दिसून येत आहे. जर तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला तर दिसेल की यात एक आजी आहेत. त्याही ''हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला''या गाण्यावर ताल धरत डान्स करत आहेत.

आजींच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @shreeram_audio_official या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच काही महिन्यांतच व्हिडिओला २२ हजारांच्या घरात लाईक्स मिळाले असून शेकडोच्या संख्येने व्ह्यजू मिळत आहेत.

प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे. शिवाय अनेक प्रतिक्रिया व्हिडिओला मिळालेल्या आहेत.त्यातील पहिल्या यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,''डान्स केला अजी नी पण पदर खाली पडू नाही दिला यालाच तर म्हणतात संस्कार'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,''आजी न तर पाण्यात जाळ लावला राव'' तर प्रत्येकांनी आजींच्या उत्साहाचे आणि डान्सचे कौतुक केलेले आहे''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT