Dance Video: अलीकडे आपल्याला सोशल मीडियामुळे वारंवार वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी मिळतात. व्हायरल व्हिडिओत कपल डान्स तर अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लग्नाच्या कार्यक्रमातील डान्स असतील तर कधी गावाकडील काही कार्यक्रमातील डान्स सोशल मीडियावर पोस्ट होतात. या व्हिडिओत वयस्कर लोकांचाही समावेश असतो.
सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात आजी-आजोबांनी अनोख्या त्यांच्या अंदाजामध्ये डान्स (Dance)केलेला आहे. जो डान्स पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल. ज्यात आजी-आजोबांनी युगत मांडली या मराठी गाण्यावर धडाकेबाज डान्स केलेला आहे. दोघांचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गावाकडील परिसर दिसत आहे. जिथे काही कार्यक्रमानिमित्ताने गावातील मंडळी मोठ्या प्रमाणात जमलेले असतात,ज्यात या आजी-आजोबांचाही समावेश असतो. पुढे पाहिले तर तिथे असलेले पुरुष वर्ग युगत मांडली या गाण्यावर डान्स करत असतात, मात्र तेव्हाच तेथील असलेले काही तरुणांनी आजींना उचलून एकाच्या खांद्यावर बसवले आणि मग काय आजींनीही उत्साहात डान्स करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर बाकीच्या तरुणांनी आजोबांनीही खांद्यावर बसवत डान्स करण्यास सांगितले. मग सर्वजण उत्साहात अन् आनंदाने डान्स करताना व्हिडिओत दिसत आहेत
डान्स व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस आलेला असून त्यातील काही यूजरने प्रतिक्रिया केली की,''हीच आपली संस्कृती'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे,''संस्कृतीने नटलेली शेवटची पिढी'', अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : आजी आजोबांचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.