Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईsss.. हा काय प्रकार! चिमुकल्यांनाही चढला झापुक झुपुक फिवर; गरब्यामध्ये दिसून आला जुनियर सुरज

Viral Video News: सध्या सर्वत्र नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे. त्यात गरबा खेळताना प्रत्येकजण अनेक वेशभुषा परिधान करत असतात,त्यातच व्हायरल होत असलेल्या चिमुकल्याने सुद्धा सुरज चव्हाणची मिमिक्री केलेली आहे.

Tanvi Pol

Navratri Special Video: महाराष्ट्राच नाही तर परराज्यातील प्रत्येक व्यक्ती टीव्हीवरील अनेक कार्यक्रम पाहत असतो. महिलावर्ग अनेक सिरीयल तर पुरुषवर्ग बातम्या आणि खेळ आणि चिमुकल्यांचे नाव घेतले तर ते कार्टुन. मात्र या सर्वात सर्व वयोगटातील आवडीच्या कार्यक्रमाने काही दिवसांपूर्वीच सांगता घेतली. तो कार्यक्रम म्हणजे मराठी बिग बॉस. बिग बॉस पाहण्यासाठी प्रत्येकजण अतिशय उत्सुक असलेला आपण पाहिला आहे. सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यात फक्त बिग बॉस संबंधित व्हिडिओ व्हायरल होत होते. सध्याही मराठी बिग बॉस संपले असले तरी त्याचे काही वेड गेलेले नाही, कारण नवरात्रीमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये एका चिमुकल्याने चक्क सूरज चव्हाणची मिमिक्री केलेली आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओत एक चिमुकला गरबा खेळताना दिसून येत आहे. मुलाच्या आजूबाजूच्या परिसरात नवरात्री(Navrati) निमित्ताने रंगीबेरंगी लायटिंग केलेली दिसून येत असून अनेक नागरिक गरबा खेळण्यासाठी जमा झालेले आहेत. व्हिडिओत तुम्ही पाहिले तर दिसेल की नवरात्री निमित्ताने लहान मुलांची एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवलेली आहे, ज्यात हा मुलगा सुरज चव्हाण बनलेला आहे. शिवाय त्याच्या एका हातात पुठ्ठ्यापासून बनवलेली बिग बॉसची ट्रॉफीही दिसून येत आहे.

लहान मुलाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या व्हायरल होत असून तो thebaviskar03 या अकाउंटवर १५ तासापूर्वी पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल असंख्य यूजर्संनी व्हिडिओला लाईक केलेले आहे तर असंख्य व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहेत.

सोशल मीडियावर नवरात्री उत्सव सुरु झाल्यापासून बरेच अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातील नेटकऱ्यांना लहान मुलाचा हा व्हिडिओ पसंतील आलेला आहे. एवढेच नाही तर अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई शहरातील असल्याचे समजत असून नक्की कुठल्या भागातील आहे हे समजले नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT