Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: देवदूत ठरली महिला! ओढणीच्या साहाय्याने वाचवले बुडणाऱ्या व्यक्तीला; संपूर्ण थराराक कॅमेऱ्यात कैद

Shocking Viral Video: सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात त्या महिलेने जोरदार वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून एका महीलेने वाचवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया जगभरातील घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होत असलेल्या घटनेचे व्हिडिओ पाहून अंगाचा अक्षरशा: थरकाप उडतो. मात्र काही वेळेस या घटनेत काही नागरिक असे असतात ज्यांच्यामुळे मोठे अपघात होण्यापासून वाचतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेने धावत्या पाण्याच्या प्रवाहामधून एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. सध्या सर्वत्र या महिलेचे मोठे कौतुक होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्ही पाहू शकता की,''संपूर्ण पाण्याचा परिसर दिसत आहे. व्हिडिओ पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान आहे, अशातच एक व्यक्ती या पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये अडकून वाहत येत होता. मात्र त्याला वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न कोणीही करताना दिसून येत नव्हते. मात्र त्या दरम्यान एक महिला धावत येते आणि तिच्या ओढणीच्या साहाय्याने त्या व्यक्तीला वाचवते. सर्व धक्कादायक (Shocking) प्रसंग तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@the_ultimate_trolls_'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ एका दिवसांपू्र्वी व्हायरल होताच तब्बल ४ लाख नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकऱ्यांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केलेले आहे. व्हिडिओ पाहताच एका यूजरने प्रतिक्रिया केलेली आहे की,'' मस्त काम केले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' ही असते महिला'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''क्या बात हे'', अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

SCROLL FOR NEXT