Snake Fight Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Snake Fight Video: बाप रे बाप! सापाने एका झटक्यात गिळला दुसरा विषारी साप; घमासान युद्धाचा VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील ज्यातीत जास्त व्हिडिओ प्राण्यांचे असतात मात्र जर सापाचा व्हिडिओ असेल तर प्रत्येकांची तारांबळ होते. त्यातच परत एकदा सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साप हे नाव घेताच भल्या भल्या व्यक्तीची तारांबळ उडते. साप समोर येणं म्हणजे जीव धोक्यात गेल्यासारखंच आहे. समोर साप पाहताच न घाबरणारी व्यक्ती आपल्याला सापडणे अशक्यच आहे. अनेकदा तुम्ही पाहिल असेल की घरात तर कधी किचनमध्ये ,पार्क केलेल्या वाहनांमध्येगी साप आढळल्याचे प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समारे येत असतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चक्क एका सापाने दुसऱ्या सापाला गिळले आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिल. मात्र काहींना सापाचा असा व्हिडिओ पाहून विश्वास ठेवणं कठीण होवून जाईल. मात्र या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने प्रत्येकाची झोप उडवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर(solapur) जिल्ह्यात रविवारी ता.१६ रोजी सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या समोर आला. सकाळी सोलापूर मधील राजेश काडादी हे मॉर्निंग वॉकला दावत चौक येथे गेले होते. त्याच दरम्यान राजेश यांना रस्त्यावर सापाचा हा भयानक प्रकार दिसून आला. तात्काळ राजेश यांनी संपूर्ण माहिती वन्यजीवप्रेमी यांना दिली. मात्र या सापांना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

वन्यजीवप्रेंमीनी काही वेळानंतर सापास सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गित अधिवासात सोडून दिले. मात्र व्हिडिओत दिसणारा साप(snake) मण्यार या सर्प प्रजातीमधील खूप विषारी साप आहे. व्हिडिओ ज्या सापाने दुसऱ्या सापाला गिळले त्या सापाचे मुख्य अन्न हे इतर सापच आहेत. या विषारी सापाचा रंग काहीसा काळा आणि त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या दिसून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT