Shocking News Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking News: विद्यार्थिनीचा रस्ता अडवला, हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; नागरिकांनी तरुणाला कपडे फाटेपर्यंत धुतलं, पाहा VIDEO

मेरठमध्ये कॉलेजमधून परतणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. हा प्रकार मोबाईलमध्ये कैद होऊन व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

उत्तरप्रदेशच्या मेरठमधून धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजमधून परतणाऱ्या मुलीचा विनयभंग करणाऱ्याला नागरिकांनी चांगलाच चपराक दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी कॉलेजमधून परत येत असताना या हरामखोराने मुलीचा हात धरला. तेवढ्यातच मुलीने आरडाओरड केला. यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात याघटनेमुळे खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे

विद्यार्थिनी कॉलेजमधून परत येत असताना रस्त्यामध्ये एका तरूणाने तिला अडवलं आहे. मुलीचा विनयभंग करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. त्याने मुलीचा हात धरला यावेळी या मुलीने आरडाओरड केली आहे. दरम्यान या ठिकाणी लोक जमा झाले. लोकांनी आरोपीला पकडून मारहाण केली आहे. दरम्यान तेथील एकाने ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलीचा विनयभंग करणाऱ्याला लोकांनी चांगलाच चोप दिला आहे. कपडे फाटेपर्यंत लोकांनी त्याला मारहाण केली आहे. महिलांनी देखील या तरूणाला मारलं आहे. स्थानिकांच्या म्हणण्यांनुसार, याठिकाणी विद्यार्थी आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. यामुळेच अशा गुन्हेगारांना वेळीच धडा शिकवणं गरजेचं आहे.

या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीवर पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या आरोपीला वेळीच धडा शिकवणाऱ्या नागरिकांचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods To Avoid At Night: रात्री चुकूनही 'हे' ५ पदार्थ खाऊ नका, शरीरासाठी ठरू शकतात घातक

Maharashtra Live News Update:छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Beed : टॉवर कोसळला अन् डाव मोडला; चोरी करताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

Shampoo Free Hair Wash Tips: शॅम्पू विसरा, केस धुण्यासाठी घरगुती या 5 गोष्टी वापरा, केस होतील लांब आणि दाट

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे थेट CM फडणवीसांच्या भेटीला; सस्पेन्स वाढला, VIDEO

SCROLL FOR NEXT