Viral Video News:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: कायद्याचा धाकचं नाही... चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत तरुणाची भाईगिरी; धक्कादायक VIDEO

Viral Video News: व्हिडिओमध्ये हायवेवर काही तरुण हातात बंदुक घेऊन दादागिरी करताना दिसत आहेत..

Gangappa Pujari

Viral VIdeo News:

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. यामधील काही व्हिडिओ पोटधरुन हसायला लावतात, काही घटना अशा असतात की विचार करायला भाग पाडतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये हायवेवर काही तरुण हातात बंदुक घेऊन दादागिरी करताना दिसत आहेत..

देशात वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन खून, जीवघेणे हल्ले केल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. अगदी दिवसा ढवळ्या मारामारी, हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून त्यामुळे कायद्याचा धाक लोकांना आहे की नाही? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हायरल (Viral Video) होत असलेल्या व्हिडिओमध्ये भरदिवसा एक व्यक्ती हायवेवर चालत्या कारबाहेर पिस्तूल हातात घेऊन धाक दाखवताना दिसत आहे. त्याच्या पाठीमागे चाललेल्या एका कार चालकाने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

हा व्हिडिओ गाझियाबादच्या सिद्धार्थ विहार जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांची कसलीही भीती न बाळगता आणि अत्यंत बेधडकपणे कारस्वार बाहेर पिस्तूल फिरवताना दिसत आहे. दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून लवकरच कडक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

आली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT