CCTV Footage Of Uttar Pradesh Saam Tv
व्हायरल न्यूज

CCTV Footage : कार धुताना तरुणाचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू; हृदयद्रावक घटनेचा VIDEO व्हायरल

CCTV Video: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कार धुत असताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh Man Dies After Heart Attack CCTV Video:

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कार धुत असताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Viral News In Marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे घडली आहे. डिडोली पोलिस स्टेशन हद्दीतील झोया गावात एक तरुण कार धुत होता. यावेळी अचानक कार धुता धुता तरुण जमिनीवर कोसळतो. यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

व्हिडिओत एक तरुण कार धुताना दिसत आहे. कार धुतल्यानंतर तो कपड्याने कार पुसताना दिसत आहे. त्यानंतर अचानक तो खाली कोसळतो. यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यात या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तरुणाला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळेच तरुणाला वेळीच मदत मिळाली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या खूप जास्त थंडी आहे. त्यामुळे थंडीत कार धुतल्याने त्याला त्रास झाला असेल. त्यामुळेच त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League 2026: नॉर्थ मुंबई पँथर्स ‘अजिंक्य’च; ईगल ठाणे स्ट्रायकर्सवरचा पराभव करत मिळवला सलग चौथा विजय

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा, दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार अन्...

Maharashtra News Live Update: बार्शी - सोलापूर मार्गांवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात

डोळ्यांच्या 'या' बदलाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, असू शकतं मोठ्या आजाराचं संकेत

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

SCROLL FOR NEXT