US School Fight Video Saam Tv (X Twitter)
व्हायरल न्यूज

US School Fight Video: भांडण मिटवणं शिक्षिकेला पडलं महाग; विद्यार्थिनी मास्तरीणच्या डोक्यात घातली खुर्ची

US School Fight Video: शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या मारामारीच्या बातम्या खूप वेळा वाचल्या असतील. एकमेकांचे डोके फोडणारे विद्यार्थी तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल.

Bharat Jadhav

American School Viral Video:

शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या मारामारीच्या बातम्या खूप वेळा वाचल्या असतील. एकमेकांचे डोके फोडणारे विद्यार्थी तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल. विद्यार्थीदशेच्या वयात तरुण- तरुणी खूप रागीट असतात. विद्यार्थ्यांचे भांडण मिटवलं नाहीतर रागाच्या भरात ते काहीही करू शकतात. यामुळे विद्यार्थी भांडण करत असतील तर त्यांचे भांडण मिटवले पाहिजे. अनेक शिक्षक असे करताही, परंतु व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका शिक्षिकेला विद्यार्थिनींचं भांडण मिटवणं महागात पडलं आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील एका शाळेचा आहे. (Latest News)

ही घटना २८ सप्टेंबरची असून ही घटना अमेरिकेतील मिशिगनमधील फ्लिंट येथे असलेल्या साउथवेस्टर्न क्लासिकल अकादमीमध्ये घडलीय. येथील दोन विद्यार्थिनींमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या विद्यार्थिनी इंग्रजी भाषेतून एकमेकांना शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. वाद करणाऱ्या विद्यार्थिनींना पाहून त्यांची शिक्षिका तेथे आली तिने त्या दोघांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. ती शिक्षिका दोघांना समजवताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

परंतु भांडण करणाऱ्या एका विद्यार्थिनीला राग अनावर होतो. ती मागे होत होत वर्गात ठेवलेली लोंखडी खुर्ची उचलते आणि थेट शिक्षिकेच्या दिशेने फेकून मारते. ही खुर्ची शिक्षिकेच्या डोक्याला लागते.

डोक्याला खुर्चीचा जोरात मार लागल्यानं शिक्षिका जमिनीवर कोसळते. काही काळ शिक्षिकेची काही हालचाल होत नाही. तरीही त्या दोन्ही मुलींचे भांडण बंद होत नाही. ते एकमेकांवर ओरडत राहतात. बराच वेळ झाल्यानंतर त्या शिक्षिकेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहून शाळा प्रशासनाने त्या मुलींच्या पालकांना पत्र लिहून त्यांना शाळेत बोलवलं.

या मुलीच्या या वादात शाळेतील एक महिला शिक्षिका गंभीर जखमी झाल्याचे शाळेच्या प्रशासनानं सांगितले. दरम्यान या विद्यार्थिनींवर कायदेशीर कारवाई होणार की त्यांना शाळेतून काढून टाकले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: धावती ट्रेन पकडताना हात सुटला, ५ सेकंद प्लॅटफॉर्म अन् ट्रेनच्या मधोमध फरफटत गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO

Saturday Horoscope : आयुष्यात वादळ येणार, धाडसी निर्णय घ्यावा लागणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार आव्हानात्मक असणार

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT