Viral Food Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Food Video : बटाट्याच्या सालीपासून बनवली अनोखी डिश; नेमका हा पदार्थ काय आहे? बघा व्हायरल VIDEO

Viral Video: बटाट्याची भाजी रोजच अनेकांच्या घरात केली जाते. काही महिला आणि लहान मुलांना तर बटाटा इतका आवडतो की

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Food Video

बटाट्याची भाजी रोजच अनेकांच्या घरात केली जाते. काही महिला आणि लहान मुलांना तर बटाटा इतका आवडतो की, त्या हट्टानं रोजच्या भाजीत त्याचा समावेश केला जातो. चवीसाठी तर काही भाज्यांमध्ये तर आवर्जून बटाटाही टाकला जातो. बटाटा आरोग्यासाठीही तितकाच पोषक असतो. बटाट्याची साल तर फेकूनच देतो. पण याच सालीची भाजी केली तर?...आश्चर्य वाटलं ना ऐकून...हा व्हिडिओ बघाच... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जेवढा बटाटा हा उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे बटाट्याची साल देखील बऱ्याच गुणधर्मांनी परीपूर्ण आहे. अशातच सोशल मीडियावर बटाट्याच्या सालीपासून तयार झालेला नवीन चमचमीत पदार्थ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चला तर आपण बघूयात बटाट्याच्या सालीपासून कोणचा नवीन पदार्थ तयार करता येतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपल्याला दिसते की, सुरुवातीला एक व्यक्ती बटाट्याची साल काढताना दिसतेय. यानंतर सालीचे बारीक- बारीक काप करतेय. बारीक काप केल्यानंतर काप एका बाऊलमधील पाण्यात भिजवण्यासाठी टाकल्या आहेत. बाऊलमधून सालीचे काप काढून एका टिशू पेपरमध्ये ठेवले. त्यामुळे सालीच्या कापातील ओलावा निघून जातो.

यानंतर बटाट्याच्या सालींना एका तेलाच्या कढईत तळण्यासाठी टाकले जाते. योग्य पध्दतीने तळून झाल्यानंतर ते कढईतून काढले जाते. यानंतर एका प्लेटमध्ये ठेऊन त्यावर काही चटपटीत मसाले टाकतात. मग हा पदार्थ खाण्यास तयार होतो.

@hungry_nachos इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. बटाट्याच्या सालीचे वास्तविक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. जस आपली हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करू शकते. कारण या सालीमध्ये व्हिटॅमिन आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की जेव्हा तुम्ही बटाट्याची भाजी बनवाल तेव्हा सालीची ही रेसीपी बनवा.

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या चटपटीत तसेच झणझणीत प्रतिक्रिया येत आहेत. व्हायरल व्हिडीओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक यूजर्सना ही रेसीपी आवडलेली आहे. एका यूजर्सने म्हटले आहे की, 'गरिबांचे फ्रेंच फ्राइज' तर आणखी एकाने लिहिले आहे की, 'हे तर आम्ही लहानपणापासून खात आलो आहोत.' असो...ही रेसिपी मात्र, अनेकांना आवडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT