Bhojpuri Dance Viral Saam tv
व्हायरल न्यूज

Bhojpuri Dance Viral: भोजपुरी गाण्यावर टोपीवाल्या काकांचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून म्हणाल वाह दादाजी वाह!

Dance Viral: काकांनी भोजपुरी गाण्यावर डान्स करत लग्नाच्या संगीत कार्यक्रमाला तडका मारलाय. काकांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

Bhojpuri Dance Viral:

भारतात हिवाळा सुरू होताच लग्नाचा हंगामही सुरू होतो. हा हंगाम मज्जा मस्ती आणि आनंद लुटण्याचा असतो. या लग्न समारंभातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मग हे व्हिडिओ कधी संगीत कार्यक्रमाचे असतात तर कधी हळदीच्या कार्यक्रमातील असतात. सध्या अशाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय यातील टोपीवाल्या काकांचा डान्स अनेकांना नाचायला भाग पाडत आहे.

लग्न समारंभात अनेक हिट ठरलेली गाणे वाजवली जातात. मग ते गाणे स्थानिक पातळीवरचे असो की, बॉलिवूड चित्रपटातील असो, ते गाणे लग्नात वाजल्याशिवाय राहत नाहीत. अनेक लग्न समारंभात भोजपुरी गाणं वाजवली जातात. या गाण्यावर न नाचणारा व्यक्तीही वेडंवाकडं का होऊना पण नाचण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातील एक म्हणजे काका. काकांनी भोजपुरी गाण्यावर डान्स करत लग्नाच्या संगीत कार्यक्रमाला तडका मारलाय.

डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला

लग्न समारंभाच्या कार्यक्रमात काकांनी भन्नाट डान्स केलाय. काकांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काकांचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करण्यात आलाय. काकांच्या या डान्सने लोकांना वेड लावले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,भोजपुरी गाणे वाजताच काकांच्या अंगात शक्ती संचारते आणि ते नाचण्यासाठी एक-एक पाऊल पुढे करतात. काकांना नाचताना पाहून आधी नाचत असलेली काही मुले बाजूला होऊन काकासाठी जागा रिकामी करून देतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर काकांनी जे डान्स मूव्ह दाखवले ते शब्दात वर्णन करता येणार नाही. काका एकापेक्षा एक असे भारी मूव्ह करत नाचू लागतात. काकांना चांगल्या प्रकारे नाचताना पाहून इतर मुलांच्या अंगात जोश निर्माण होतो आणि तेही पुन्हा काकांसोबत नाचयला लागतात.

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @ChapraZila नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ' बाबाला आजी नाचू नका म्हणून वारंवार सांगत आहे पण, काका ऐकत नाहीत. बातमी लिहेपर्यंत ३० हजार लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने काकांचे कौतुक करत लिहिले - भोजपुरी गाणे वाजल्यावर म्हाताराही तरुण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर बदलले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra News Live Update: पीएम मोदींच्या आव्हानानंतर शरद पवारांची पोस्ट

Maharashtra politics : राष्ट्रवादीत 'भूकंप'; पटेल-तटकऱ्यांची पदे कापली? पार्थ आणि जय पवारांची एन्ट्री, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

Navi Mumbai Picnic Spot: खारघरचं सेंट्रल पार्क ते बेलापूरचं पारसिक हिल, नवी मुंबईतील ही 5 ठिकाणे पर्यटकांना घालतायेत भुरळ

चुका तुमच्या अन् भुर्दंड जनतेला का? PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे कडाडले

SCROLL FOR NEXT