Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पाण्यासाठी फ्रिजचा दरवाजा उघडला, समोर साप पाहून तोंडचं पाणी पळालं

Snake Viral Video: साप म्हटलं की प्रत्येजण कित्येक अंतर लांब राहतो. पण हाच साप जर तुमच्या घरात आढळला तर, सध्या एक असा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो पाहून तुम्हाला ही विश्वास बसणार नाही.

Tanvi Pol

Snake In Fridge: बऱ्याचजा काही प्रसंग आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त धक्कादायक आणि भयावह ठरतात. सध्या असाच एक धक्कादायक आणि चकित करणारी घटना नुकतीच समोर आली, ज्यामध्ये एका घराच्या फ्रिजमध्ये एक भलामोठा साप आढळून आलेला आहे. हे वाचून प्रत्येकाला विश्वास ठेवणं कठीण होईल, पण असं खरंच घडले आहे आणि ते एका घरी.

फ्रिजमध्ये साप, महिला शॉकमध्ये!

उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकजण गरमीने हैराण झालेला आहे. शरीर थंड ठेवण्यासाठी थंड पाणी पित असतो. त्यातच एका महिलेने घरी जाऊन थंड पाणी पिण्याचे ठरवले. त्यासाठी ती घरातला फ्रिज उघडण्यासाठी गेली. मात्र, फ्रिजमध्ये अत्यंत भलामोठा साप(Snake) बसलेला होता. महिलेने तात्काळ स्वत:ला वाचवत सर्व प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

फ्रिजमध्ये साप कसा पोहचला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील kashikyatra या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ फक्त इन्स्टाग्रामवर नाही तर फेसबूक, ट्विटर (एक्स) या माध्यमांवरही व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहे तर लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळालेले आहेत.

व्हिडिओ पाहून नेटकरी हादरले

हा व्हिडिओ(Video) पाहून अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये हैराणजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आता घरीपण काळजी घ्यावी लागेल'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''सापाला बाहेर गरमी लागत आहे त्यामुळे तो तिथं गेला'' शिवाय काहींनी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.

टीप: सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT