Two teams started fight over umpires wrong decision in bangladesh celebrity cricket league Twitter
व्हायरल न्यूज

Viral Cricket Video: बाबो! एका बाऊंड्रीमुळे पेटला वाद; दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी तुडवलं, VIDEO

Fight In Cricket: अंपायरच्या एका निर्णयामुळे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे

Ankush Dhavre

Viral Cricket Video:

क्रिकेट लीग स्पर्धेचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जगभरात अनेक मोठ मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धांचे आयोजन केले जाते. आता सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेचं देखील आयोजन केलं जाऊ लागलं आहे. दरम्यान बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेत अंपायरच्या एका निर्णयामुळे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे

या दोन्ही संघातील वाद इतका जोरदार पेटला की, विरोधी संघातील खेळाडूने महिला अभिनेत्रीला हाणामारी केली. बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आलेली हा फ्रेंडली सामना शेवटी आयोजकांना रद्द करावा लागला आहे.

तर झाले असे की, बांगलादेशमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अंपायरच्या एका निर्णयामुळे हा वाद झाल्याचं समोर आलं आहे. एका संघाचं म्हणणं होतं की, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला आहे त्यामुळे अंपायरने चौकार द्यायला हवा. तर विरोधी संघातील खेळाडूंना हे पटलं नव्हतं. या निर्णयावरून दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जोरदार वाद पेटला. (Latest sports updates)

या मारहाणीत लाथा बुक्क्या आणि बॅटचा वापर करण्यात आला. ज्यात ६ खेळाडू गंभीर दुखापतग्रस्त झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दिपांकर दिपोन आणि मुस्तफा कमाल राज यांच्यातील संघात साखळी फेरीतील सामना सुरू होता. मात्र वाद झाल्यानंतर आयोजकांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT