Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईईई हा काय प्रकार! धावत्या लोकलमध्ये पुरुषांमध्ये तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल

Mumbai Local Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात पुरुषांची तूफान हाणामारी झालेली आहे. चूक नक्की कोणाची एकदा प्रत्येकाने व्हिडिओत नक्की पहा.

Tanvi Pol

Fighting Video: मुंबई लोकलमध्ये दर मिनिटांला लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. मग असंख्य प्रवाशांनी भरलेल्या लोकलमध्ये अनेक घडामोडी घडत असतात. अनेकदा महिलांमध्ये किरकोळ कारणांवरुन हातापायी तर कधी तूफान वादावादी, मात्र सध्या पुन्हा असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,मात्र मुंबई लोकलमध्ये झालेली हाणामारी महिला वर्गाची नसुन चक्क पुरुषांची आहे.

घडले तरी काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मुंबई लोकल(Local) दिसत असून अनेक प्रवाशी यातून प्रवास करत आहेत. व्हिडिओत पुढे पाहिले तर संपूर्ण लोकलचा डब्बा पुरुषांच्या गर्दीने भरलेला आहे त्यातच दोन पुरुष प्रवाशांमध्ये काही कारणावरुन सुरुवातीस वादविवाद होत असतात मात्र काही वेळात वादाचे रुपांतर तूफान हाणामारीत होते. दोघांची सुरु असलेली हाणामारी त्याच डब्ब्यात असलेल्या सहप्रवाशांनी थांबवली,मात्र त्यातील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हाणामारी शूट केली आहे.

व्हायरल होत असलेला रेल्वेचा व्हिडिओ विरार- चर्चगेटा या रेल्वे स्थानकादरम्यान असल्याचे समजते. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या ''chalo.virar'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. चार दिवसापूर्वी व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट केल्यानंतर चार हजारहून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर व्ह्यूजही व्हिडिओला अनेक मिळत आहेत.

मुंबई लोकलमधील अशा अनेक घटना नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत असतात तर अनेक यूजर्स प्रतिक्रियाही करत असतात, त्यातील हा व्हिडिओ पाहून काहींनी प्रतिक्रिया केलेली आहे की,''सीट मिळण्याच्या कारणावरुन झाले असेल'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''होऊ द्या जोरात..'', अशा अनेक गमतीदार तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT