up google
व्हायरल न्यूज

Viral Video: विषारी सापासोबत डान्स अंगाशी आला, लाइव्ह स्टेजवरच कोब्रा डसला!

Bihar Viral Video of Snake Bite: बिहारमधील सहरसा येथील एका कलाकाराला विषारी सापांसह चित्रपटातील गाण्यावर डान्स करणे महागात पडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिहारमधील सहरसा येथील एका कलाकाराला विषारी सापासंह चित्रपटातील गाण्यावर डान्स करणे महागात पडले. लाइव्ह शो कार्यक्रमादरम्यान एका विषारी कोब्राने कलाकाराला चावा घेतला. सर्पदर्शानंतर कलाकाराची तब्येत बिघडू लागल्यावर लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले. ही संपूर्ण घटना सहरसा जिल्ह्यातील सत्तारकटैया ब्लॉकमधील राकिया बिजलपूर वॉर्ड क्रमांक ६ मधील आहे, जेथे छट पूजेच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात कलाकार सारासोबत नाचत होते. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की रंगमंचावर दोन कोब्रा साप ठेवण्यात आले होते आणि गाण्याच्या नशामध्ये कलाकाराला इतका नशा चढला की कोब्रा सापाने कधी चावा घेतला ते कळलेच नाही. नृत्यादरम्यान कलाकाराला चक्कर येऊ लागल्यावर त्याला कोब्रा साप चावल्याचे समजले.

कलाकार गौरव कुमार यांनी सांगितले की, तो केवळ ₹२००० मध्ये आपला जीव धोक्यात घालून लोकांचे मनोरंजन करत होता. यादरम्यान सापाने मला केव्हा चावा घेतला हेच कळले नाही. गौरवने सांगितले की, तो अनेक वर्षांपासून असे कार्यक्रम करत आहे अशी घटना कधीच घडली नाही, ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. जर त्याला वेळेवर रुग्णालयात नेले नसते तर त्याचा मृत्यू झाला असता असेही तो म्हणाला. याआधी कलाकाराला अनेक तांत्रिकांकडे नेण्यात आले मात्र तेथेही तो बरा न झाल्याने त्याला सहरसा सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

डिस्क्लेमर : हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची पडताळणी करण्यात आलेली नाही. याचे कुठलेही समर्थन करत नाही. फक्त माहितीसाठी व्हायरल वृत्त देण्यात आले आहे.

Written By: Dhanshri Shintre

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT