Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वेड्याचा बाजार! प्रसिद्धीसाठी रेल्वेरुळावर झोपला अन् पुढे जे घडलं ते भयंकर

Dangerous Stunt: सोशल मीडियावर सध्या एका भयानक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेली ही घटना भारतातील आहे. जिथे एका तरुणाने काही दिवसांच्या प्रसिद्धीसाठी एक स्टंट केला आहे.

Tanvi Pol

Young Man Stunt: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार झालेत. कोण जीव धोक्यात घालतोय, कोण दुसऱ्याच्या जीवाशी खेळतोय. प्रसिद्धीच्या नादात असे कृत्य करताना हे लोक कुठवर जातील, याचा अंदाजच लागत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका तरुणाने फक्त व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणून थेट रेल्वेरुळावर जाऊन झोपण्याचा धोकादायक स्टंट केला आणि पुढे जे घडलं ते एकदा व्हिडिओत पाहा.

व्हायरल( Viral Stunt) होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला एक परिसर आहे. जिथे रेल्वेचा मार्ग दिसत आहे. काही वेळात एक तरुण तिथे येतो आणि रेल्वे रुळावर बसतो. त्यानंतर थेट तो रेल्वे येण्याच्या काही वेळाआधी त्या रेल्वे ट्रॅकवर झोपतो. सुरुवातील काही समजत नाही. मात्र, तरुण रेल्वे ट्रॅकवर झोपताच त्याच्यावरुन एक भरधाव वेगान ट्रेन जाते. फक्त सोशल मीडियाच्या रिल्ससाठी तरुणाने हा भयंकर प्रकार केलेला असतो.

हा प्रकार नेमका कुठे घडला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून हा प्रकार तरुणासोबत असलेल्या त्याच्या मित्राने मोबाईलमध्ये कैद केला आहे. काही तासांतच हा व्हिडिओ देशभर व्हायरल झालेला आहे. इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबूकवरही व्हायरल झालेला आहे. सध्या तो इन्स्टाग्रामवरील mdboni.amin.587 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

व्हिडिओला( Stunt Video) लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. पण मोठ्या संख्येने या व्हिडिओवर टीका करण्यात आलेली आहे. एका यूजरने कमेंट केली,''पोलिसांनी पकडून जोरदार मारायला पाहिजे'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले,''सध्याची तरुणाई ही'' अशा प्रकारे संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT