Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: घराबाहेर बसायचं की नाही? गाडीवरुन आले अन् तरुणीच्या हातातून फोन हिसकावला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Shocking Thief Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका ठिकाणी चोरीची घटना घडलेली आहे. चला पाहूयात नेमकी चोरीची घटना कुठे घडली.

Tanvi Pol

Shocking Video: गेल्या काही वर्षापासून जगभरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात ऐकण्यास मिळत आहेत.गर्दीतून जात असताना पाकीटमारी,फोन चोरण्याच्या घटना घडत होत्या मात्र आता दिवसाढवळ्या चोर नागरिकांच्या घरात घुसून चोरीही करत असल्याने चोरांची मोठी दहशत वाढू लागली आहे.

सोशल मीडियावर दुकानात झालेल्या चोरीपासून ते फोन चोरीच्या घटनांचे व्हिडिओ(Video) पाहण्यास मिळतात.मात्र त्यातच सध्या पंजाबमध्ये अशीच एक घटना घडली आहे,ज्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

तरुणी गाफील, चोरटे सावध!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला,एक तरुणी घराबाहेर असलेल्या वाहनावर निंवात बसलेली आहे आणि मोबाईल पाहण्यास मग्न आहे.रात्रीची वेळ असल्याने घराबाहेर परिसरातील नागरिकांचा वावरही दिसून येत नाही.मात्र तरुणी मोबाईल पाहण्यात व्यस्त असते तेवढ्यात तिथे एका दुचाकीवरुन दोन तरुण येतात आणि तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून तेथूल बाईकवरुनच पळ काढतात.त्यानंतर तरुणी घाबरुन जाते आणि तिचा आवाज ऐकून घरातील चिमुकली मुलं बाहेर येतात.सर्व घटना घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेली संपूर्ण घटना पंजाबमधील असल्याचे समजून येत आहे,मात्र याची खात्री होऊ शकली नाही.चोरीचा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील 'Ghar Ke Kalesh' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेट केली आहे,''बिचारी खूप वाईट झालं'' तर अनेक यूजर्संने कमेट केली आहे,''बरं झालं जीवाला काही झालं नाही'',अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Tourism: खरंच माथेरान, महाबळेश्वर विसराल! सोलापूरपासून 123 km दूर असलेल्या 'या' हिल स्टेशनवर एकदा जाच

Maharashtra Live News Update: अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्डर लॉंचिंग; मध्यरेल्वेचा आज रात्री ब्लॉक

Mix Dal Dosa Recipe: घरीच बनवा मिक्स डाळींचा पौष्टिक डोसा; नाश्त्यासाठी हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन

एका मिनिटात उमेदवार जाहीर करीन!सुनील शेळके यांचा भाजपला इशारा; राजकारणात खळबळ|VIDEO

Bhakri Tips: ज्वारीची भाकरी थंड झाल्यावर कडक होतेय? 'या' सोप्या टीप्सने भाकरी होईल अगदी कापसासारखी लुसलुशीत

SCROLL FOR NEXT