Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: केसांमुळे पेटला वाद! लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये जोरदार राडा अन् धक्काबुक्की

Women Fight Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच तो प्रत्येक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे, असे काय घडले असले ते पाहा.

Tanvi Pol

Women Argument Train: गर्दीच्या वेळी मुंबई लोकलमध्ये प्रवास करणे हे तसे मोठ्या कसरतीचेच काम असते. त्यामध्ये जर काही प्रवासी एकमेकांशी वाद सुरु झाला, तर तो वाद आणखीनच वाढतो. असाच एक प्रकार नुकताच मुंबई लोकलमध्ये घडला आहे, ज्यात दोन महिलांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

धक्काबुक्कीने पेटला वाद, महिलांचा लोकलमध्ये राडा

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला, मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे. मात्र, नेहमी प्रमाणे या महिलांच्या डब्ब्यात दोन महिलांध्ये काही कारणावरुन वाद सुरु होतो. ट्रेनमध्ये तुम्ही महिला प्रवाशांची तुफान गर्दी दिसत आहे आणि त्यामध्ये या दोन महिलांचा वाद पाहून अन्य महिला हैराण झालेल्या दिसत आहे. परंतू, या वादाचे कारण समजू शकलेले नाही.

लोकल ट्रेनमधील या घटनेचा व्हिडिओ सध्या me_ghatkoparkar या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. शिवाय या व्हिडिओला आतापर्यंत लाखोंचे व्ह्यूज मिळालेले असून हजारो लाईक्स मिळालेले आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

महिलांचा लोकल (Local Train)मधील हा राडा पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''नेहमीचा राडा आहे या महिलांचा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कारण काय आहे पण'' शिवाय काही यूजर्संनी संतापजनक तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT