Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शिक्षणाच्या आईचा घो! विद्यार्थ्यांना शिकावायचं सोडलं, भरवर्गात शिक्षिका डाराडूर झोपली

Shocking Teacher Video: गेल्या काही दिवसांपासून एका शिक्षेकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाकडून संताप होत आहे. नक्की काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

Meerut teacher sleeping video: मेरठमधील एका ज्युनिअर हायस्कूलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये शिक्षिका वर्गात शिकवण्याऐवजी खुर्चीवर झोपलेली स्पष्टपणे दिसत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

झोपलेली शिक्षिका – विद्यार्थ्यांचे काय?

हा कॉलेजमधील व्हिडिओ कोणी शूट केला, याबाबत अजून कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम स्पष्टपणे दिसते की, शिक्षका (Teacher) शिक्षण देण्याच्या आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असून खुर्चीवर बसून झोपलेली आहे. शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतो, पण जेव्हा शिक्षकच आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा शिक्षणसंस्थेतील शिस्त, मूल्यं आणि गुणवत्ता यावर मोठा गंभीर परिणाम होतो.

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या मेरठमधील आहे. काही तासांत व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशस मीडियावर तुफान पाहिला गेला असून आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंचे लाईक्स मिळत असून मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहेत. शिवाय या शिक्षिकेचा कारनामा नेटकऱ्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरीह शेअर केलेला असून सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेला आहे.

झोपेचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''पैसे या मॅडम झोपेचे घेतात'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''धक्कादायक बाब आहे'' शिवाय तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''अनेक शहरांमध्ये असे हाल आहेत'' अशा अनेक तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टीप: शिक्षिकेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT