Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शेताच्या बांधावर आजींचा जलवा; शेतकरी महिलेचा डान्स पाहून नेटकरी थक्क

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका आजींचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तुफान पसंती दिलेली आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एकदा पाहा.

Tanvi Pol

Farmer Lady Dance Video: नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत एक शेतकरी आजी शेताच्या बांधावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आजींच्या उत्साहाने आणि ऊर्जा पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्याने शेअर केला जात असून, या आजींचं कौतुक करणाऱ्या कमेंट्सचा वर्षाव होतोय.

भन्नाट डान्स पाहून नेटकरी थक्क

व्हायरल (Video) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला शेतात एक आजी आणि त्यांच्या सोबत एक महिला आहे. ज्यांनी शेतात काम करताना साधारण पोशाख परिधान केलेला आहे. काम करुन जरासा वेळ मिळाल्यानंतर आजी आणि त्यांचा सोबत असलेल्या महिलेने डान्स केला आहे. डान्स करताना आजी अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसत आहेत. वय काहीही असो, मन तरुण असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे या आजींनी दाखवून दिलं आहे.

आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात हा व्हिडीओ एक वेगळाच ठसा उमटतो. आतापर्यंत हा व्हिडिओ व्हायरल होताच लोखांचे व्ह्यूज मिळवून चर्चेत आला आता तर हजारो लाईक्स व्हिडिओला मिळालेले आहे. मात्र, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ajay_sakharkar_30 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

आजीनं जिंकली लाखोंची मनं

आजींचा डान्स (Dance) प्रत्येक नेटकऱ्यांना आवडलेला आहे आणि त्यातील काही यूजर्संनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,''असा आनंद प्रत्येकाला घेता आला पाहिजे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''आजच्या दिवसातील सर्वात भारी व्हिडिओ'' तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''मला माझ्या गावची आठवण आली'' अशा प्रकारे कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT