Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ऐन लग्नातच गर्लफ्रेंडचा राडा! सर्वांसमोर नवरीला केली मारहाण, नंतर पाहुण्यांनी तरुणीला धोपटलं

Wedding Viral Video: सोशल मीडियावर लग्नातील अनेक घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर असतात तर कधी हैराण करणारे असतात. त्यातच एका व्हिडिओने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Tanvi Pol

Wedding Shocking Video: लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र नांत. नातेवाईक, कुटुंब आणि मित्रमंडळी उपस्थितीत सुरुवात करणारा खास क्षण असतो. मात्र, या आनंदी सोहळ्यात अचानक गोंधळ सुरु झाला तर आणि हा गोंधळ वराच्या प्रेयसीनेच केला तर काय होईल? सध्या अशाच धक्कादायक घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

पाहणाऱ्यांचे उडाले तीनतेरा

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ (Video) सध्या जबरदस्त व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला, लग्नमंडप सजलेला दिसत असून वऱ्हाडी मंडळी नटून थटून आलेली, ढोल-ताशांचा गजर सुरू, आणि लग्नाची विधी सुरू होती. मात्र, इतक्यात अचानक मंडपात एक तरुणी धावून येते आणि थेट वधूपाशी जाऊन तिला जोरदार चापट देते. क्षणार्धात मंडपातील वातावरण बदलते. थेट आवाज, किंकाळ्या, आणि गोंधळ सुरु होतो.

व्हायरल होत असलेली ही घटना नेमकी कुठली आहे हे अद्याप समजले नाही. मात्र, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील khulasafirst या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही,''लग्नाच्या हॉलमध्ये प्रेयसीचा हाय व्होल्टेज ड्रामा वधूला बेदम मारहाण करण्यात आली आणि तरुणीने सांगितले की, वर तिचा नवरा आहे. वधू-वरांनी तरुणीविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे'' असे घडलेले घटनेचे वर्णन केले आहे.

ही संपूर्ण घटना पाहणाऱ्यांना धक्का देणारी होती शिवाय व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतरही अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''जबरदस्त'' तर दुसऱ्या यूजर्संनी कमेंट केली,''सध्या लग्नात असा ड्रामा नेहमीचा झाला आहे'' तर काहींनी नवऱ्याविरोद्धात संताप व्यक्त केलेला आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT