Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शेतात कोलांट्याउड्या मारणाऱ्या आजोबांचा व्हिडिओ व्हायरल

Old Man Viral: सोशल मीडियावर सध्या एका आजोबांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे. असे नक्की काय आहे व्हिडिओते ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Grandfather Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे, ज्यात एक आजोबा शेतात कोलाट्यां उड्या मारताना दिसत आहेत. त्यांच्या शरीराची लवचिकता आणि आजोबांचा उत्साह पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.

व्हिडिओने वेधले सर्वांचे लक्ष

प्रकाश भोसले असं या आजोबांचे नाव आहे. नांदेडच्या उमरी तालुक्यातील कळगाव येथील प्रकाश भोसले हे रहिवाशी आहेत. यांचा हा व्हिडिओ आहे. ते चांगले कुस्तीपटू होते. आता त्यांचे वय 60 वर्षे आहे. एका तरुणाने त्यांच्या ह्या उड्या आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे.

हा व्हिडिओ फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून फेसबूकच्या Sandeep Bhaskarrao patil या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही तासांतच लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून हजारो लाईक्स मिळालेले आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

आजोबांचा(Old Man) उत्साह पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आजोबांचा नाद खुळा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,'' तरुणाईला लाजवेल असा उत्साह'' तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''लय भारी आजोबा'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

SCROLL FOR NEXT