Mumbai Ac Local Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local: मुंबई एसी लोकलमधील बत्ती गुल; भर पावसात उकाड्याने प्रवाशी घामाघूम

Power Outage In Ac Local Train: सोशल मीडियावर सध्या एक अजब घटना समोर आलेली आहे. ज्यात एसी लोकल ट्रेनची लाईट गेलेली आहे. सर्व अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांनी प्रवास केलेला आहे.

Tanvi Pol

Mumbai News: एसी लोकलने प्रवास करताना प्रवाशांना थंडाव्याची अपेक्षा असते. मात्र, नुकताच प्रवाशांना एका एसी लोकलने जाताना अपेक्षाभंगाचा अनुभव दिला. दादरहून विरारकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे गाडीत असलेले एअर कंडिशन यंत्र बंद पडले शिवाय चाकरमानी गरमीने घामाघूम झाले. या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. सध्या या सर्व प्रकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्हाला एसी लोकलमधील(Local Train) लाईट गेलेली दिसत असून सर्वत्र काळोख पसरलेला आहे. अशातच एसी लोकलमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. जर तुम्ही पाहिले तर लोकलमधील लाईट गेल्याने दरवाजेही उघडलेले आहेत आणि प्रवाशी लटकून प्रवास करत आहेत. हा धक्कादायक प्रकार एका एसी लोकलमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

लोकलमधील हा प्रकार दोन दिवसांआधीचा असल्याचे कळत असून हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील mirabhayanderka या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे शिवाय फेसबूक, ट्वीटर(एक्स) अशा प्रसिद्ध माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे.

प्रवाशांसह नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया

एसी लोकलमधील हा प्रकार पाहताच सोशल मीडियावर(Media) प्रत्येकाने संताप व्यक्त केलेला आहे. काहींनी ''ही अत्यंत लजास्पद बाब'' असल्याचे म्हटलं आहे तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की,''कशासाठी येवढे पैसे भरायचे'' तर अशा प्रकारे अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, एसी लोकलमधील ही घटना दादरहून विरारकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये घडली आहे, याची साम टीव्ही पुष्टी करत नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT