Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: झिंज्या उपटल्या, एकमेकींना धोपटलं; धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांचा राडा, VIDEO

Women Fighting Video: सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात पुन्हा एक धक्कादायक असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नक्की असे काय घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Women Fighting In Local Train: मुंबई लोकल ट्रेनमध्ये कायम प्रवाशांची तुफान गर्दी असते, पण अनेकदा ही गर्दी मोठ्या घटनेसाठी कारणीभूत ठरते. सध्या असंच काहीसं धावत्या लोकल ट्रेनमध्ये घडलं, जिथे महिला प्रवाशांमध्ये जबरदस्त राडा रंगला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यामध्ये दोन महिला एकमेकींवर तुटून पडताना दिसत आहेत.

महिला प्रवाशांमध्ये तुफान भांडण

व्हायरल(Viral) होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला, लोकलमधील महिलाच्या डब्ब्यात काही महिलांचा वाद सुरु असलेला दिसत आहे. सुरुवातील हा वाद शाब्दिक असतो. त्यानंतर एक महिला दुसऱ्या महिलेला जोरदार मारताना दिसते. काही वेळातच ही हाणामारी इतकी टोकाला पोहोचते की इतर प्रवाशांनाही हस्तक्षेप करावा लागला आणि त्यातीलच एका महिला प्रवाशाने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हिडिओ व्हायरल, नेटिझन्सची प्रतिक्रिया

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''हैराण नका होऊ, हे तर नेहमीच झालं आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''महिलांचे नेहमीचे असते'' शिवाय तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''हद्द झाली'' तर अनेक यूजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेलया आहेत.

मुंबई लोकल (local Train) ही मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. मात्र, मुंबई लोकलमध्ये असे प्रकार वारंवार घडत असल्याचे आपल्याला दिसतात. सध्या लोकल ट्रेनमधील हा व्हिडिओ फेसबूकवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक हजारोंच्या घरात लाईक्सही मिळालेले आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : आयोगाचा भाजपला जोरदार धक्का, ऐन निवडणुकीत परवानगी नाकारली

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹३००० ऐवजी ₹१५०० आले, आता डिसेंबरचा हप्ता का रखडला? महत्त्वाची माहिती समोर

Maharashtra Live News Update: १० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी, माजी आमदार नितीन भोसले यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश

Tilgul Poli Recipe : मकर संक्रांतीला फक्त १० मिनिटांत बनवा मऊसूत 'तीळ गुळाची पोळी', वाचा पारंपरिक रेसिपी

Shubh Shravani Serial : "प्रेम असावं तर असं असावं!"; 'शुभ श्रावणी' मालिकेची रिलीज डेट जाहीर, पाहा खास VIDEO

SCROLL FOR NEXT