Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हग करा, गुलाब घ्या...! तरूणाची भन्नाट आयडिया, तरूणी झाल्या फिदा, पाहा क्यूट व्हिडीओ

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.जो सध्या प्रत्येक नेटकरी वर्गाच्या मोठ्या पसंतील आलेला आहे.नक्की काय घडले आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Young Boy Video: जगभरात आतापर्यंत तुम्ही पुणेरी पाट्यांची चर्चा ऐकली असेल.मात्र गेल्या काही वर्षात तुम्ही काही तरुणांना भररस्त्यात पोस्टरवर मजेशीर गोष्टी लिहून उभं राहिलेले पाहिले असेल,असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच आहे,ज्यात भररस्त्यात एक तरुण 'हग करा, गुलाब घ्या' असे पोस्टर पकडून उभा राहिलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक रस्त्याच्याकडेला एक तरुण उभा आहे.तरुणाच्या समोर एक लहानशी बादली आहे,ज्यामध्ये विविध रंगी गुलाबाची फुले(Flowers) आहेत.ऐवढेच नाही तर तरुणाच्या हातात पाहिले असता तुम्हाला एक सफेद रंगाचे पोस्टर दिसत आहे.ज्या पोस्टरवर 'हग मी पिक अ रोज' असे इग्लिंशमधून लिहिले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पुढे पाहिले तर तरुणाच्या हातात पोस्टर पाहून रस्त्यावरुन जाणारा प्रत्येक नागरिक त्याच्याकडे पाहत आहे.तेवढ्यातच एक तरुणी तरुणाच्या पोस्टरला पाहून त्याच्याकडे येते आणि त्याला हग करते,त्यानंतर त्या लहानशा बादलीतून एक लाल रंगाचे गुलाब उचलून घेऊन जाते.त्यानंतर अनेक तरुण येतात आणि तरुणाला मिठी मारुन गुलाब घेऊन निघून जातात.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पोस्टर घेऊन उभ्या असलेल्या तरुणाचा व्हिडिओ(Video) तिथे असलेल्या एका व्यक्तीने लांबून मोबाईलमध्ये कैद केला आहे.सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''भारीच भावा''तर अनेक यूजर्संनी कमेंट केली आहे,''मस्तच'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Maharashtra News Live Update: ठाण्यात उन्नत मार्गाचा लोखंडी सांगाडा कोसळला

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेचा दिग्गज नेता फोडला, ५ नगरसेवक अन् २०० पदाधिकाऱ्यांसह हाती घेतलं कमळ

Skin Glow Drink : फक्त ७ दिवसांत ब्रायडल ग्लो हवाय? 'हे' सोपे अन् जादुई ड्रिंक पिऊन तर पाहा

Ladki Bahin Yojana : पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होणार? सप्टेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT