Delhi Metro Viral Video Saamtvnews
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: OYO ला जा! बॉयफ्रेंडसोबत फिरत होती पत्नी अन् नवऱ्याने रंगेहाथ पकडलं; मेट्रो स्टेशनवर तुफान राडा | व्हिडिओ

Husband chases Wife at Delhi Metro Station: मेट्रो स्टेशनवर पत्नी आपल्या बॉयफ्रेंडच्या हातात हात घालून फिरत असताना पतीने पकडले अन् दोघांमध्ये तुफान राडा झाला...

Gangappa Pujari

Husband Wife Fight On Delhi Metro Station Video: दिल्ली मेट्रो सध्या विविध कारणांनी चांगलीच चर्चेत आहे. कधी मुलांच्या स्कर्ट घालून एन्ट्रीने तर कधी कपलच्या रोमान्सने दिल्ली मेट्रो वादात सापडली होती. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर चांगलाच संताप व्यक्त केला होता.मात्र हे प्रकार काही थांबता थांबेनात.

सध्या दिल्ली मेट्रोमधील आणखी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओमध्ये बॉयफ्रेंडसोबत फिरताना एका तरुणीला तिच्या पतीने पाहिल्यानंतर दोघांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. हा हाय होल्टेज ड्रामा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Viral Video News In Marathi)

बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसली पत्नी...

नेहमी वेगवेगळ्या व्हायरल व्हिडिओंनी चर्चेत येणारे दिल्ली मेट्रो स्टेशन( Delhi Metro) पती पत्नीच्या भांडणाने चर्चेत आले आहे. पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना पतीने तिला रंगेहाथ पकडले. ज्यानंतर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाजी झाली. पती तिला शिवीगाळ करत होता, तर पत्नीने त्याला मारहाणही केली.

दोघांचा हा वाद कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच (Viral Video) व्हायरल होत आहे. पतीला अचानक पाहताच पत्नीची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतरही तिने सारवासारव करत वाद घालायला सुरूवात केली, तसेच आपल्या पतीला मारहाणही केली. विशेष म्हणजे या दोघांचा प्रेमविवाह झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

मेट्रो स्टेशनवर हायहोल्टेज ड्रामा..

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेट्रो स्टेशनवर पत्नी आपल्या बॉयफ्रेंडच्या हातात हात घालून आरामात फिरत आहे. तर तिचा पती तिचा पाठलाग करत आहे. यावेळी तिचा पती एका व्यक्तीला "काका, मला इकडे कोणाची मदत हवी असेल तर काय करू? कारण ती बघा माझी पत्नी आहे मला सोडून पळून गेली आहे. तिच्या प्रियकराचा हात धरुन फिरत आहे. मी अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत आहे. आज ती रंगेहात सापडली.. असे सांगताना दिसत आहे.

पुढे ती महिला एका दुकानात थांबताच पती तिला गाठतो आणि झालं का फिरून असा प्रश्न विचारतो. पतीला अचानक पाहून पत्नी गोंधळून जाते. त्यानंतर या दोघांमध्ये चांगलाच वाद होतो. पती तिला तुझा व्हिडिओ शूट केला आहे.. आता कोर्टात भेटू असा इशाराही दिला देत आहे. त्यानंतर दोघांमध्ये चांगलाच वाद होतो.

नेटकऱ्यांचा संताप...

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी पत्नीला चांगली अद्दल घडवली पाहिजे.. अशा शब्दात खडेबोल सुनावले आहेत. तर काही जणांनी लव मॅरेज करणारीही धोका देवू शकते का? असाही प्रश्न विचारला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT