Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नाद खुळा! उत्तरपत्रिकेत पठ्ठ्याने लिहिला असा काही डायलॉग; थेट शिक्षकांनी दिले ८० पैकी ८० गुण

Funny Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका विद्यार्थ्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.ज्याने पेपरच्या शेवटच्या पानावर असं काही लिहिलं आहे,ज्यामुळे शिक्षक अतिशय हैराणही झाले आहेत.

Tanvi Pol

Student’s Viral Exam Answer: शाळेतील परीक्षा हा प्रत्येक शाळेय विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो.बऱ्याचदा काही विद्यार्थ्यी परिक्षेमधील काही प्रश्चांचे अनपेक्षित आणि हटके उत्तर देतात जे वाचून शिक्षकही थक्क होतात.सध्या सोशल मीडियावर अशाच एका हटके विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर आजपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral) झालेले आहेत.कधी विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षकांना दिलेले सरप्राईज तर कधी शाळेतील कार्यक्रमांतील धम्माकेदार डान्स,मात्र काही विद्यार्थ्यी परिक्षेत मस्ती करतानाचेही व्हिडिओ असतात,मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकरी वर्गात चांगल्याच पसंतील आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक शिक्षक विद्यार्थ्यांचे पेपर तपासताना दिसत आहेत.त्यानंतर ते एका विद्यार्थ्यांचा पेपर तपासत असतात त्यानंतर शिक्षक बोलतात की,''आतापर्यंत या विद्यार्थ्याने सर्व प्रश्न बरोबर सोडवले आहेत'' मात्र त्यानंतर शिक्षक उत्तरपत्रिकेचे शेवटचे पान दाखवतात आणि विद्यार्थ्याने ज्यावर लिहिले असते,''जिंकण्याची मजा तेव्हाच येतो, जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची वाट बघत असतात''विद्यार्थ्याने लिहिला हा डायलॉग वाचून शिक्षक पोटधरुन हसतात आणि त्या विद्यार्थ्याला ८० पैकी ८० मार्क देऊन टाकतात.

@Prof_Cheems या एक्स अकाउंटवर व्हिडिओ (Video)अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी व्हिडिओला हजारो लाईक्स दिलेले आहेत तर लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

टीप: विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Face Cream: घरच्या घरी बनवा बीटरूट फेस क्रिम, आठवडाभरात चेहऱ्यावर दिसेल गुलाबी चमक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Vitamins: वेळीच व्हा सावध! व्हिटॅमिन्सच्या गोळ्या रोज घेणं ठरेल घातक; डॉक्टरांनी सांगितल्या 'या' मर्यादा, आताच घ्या जाणून

MHADA Lottery: खुशखबर! म्हाडाची २००० घरांची लॉटरी! कल्याण-ठाण्यात मिळणार हक्काचे घर; या दिवशी करता येणार अर्ज

Hrithik Roshan Birthday : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत स्टार किडची संपत्ती किती? जगतोय लग्जरी लाइफस्टाइल

SCROLL FOR NEXT