Girl Eating Soap Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

'I Love Soap' म्हणाली अन् पोरीने बघता बघता साबण खावून टाकला; | VIRAL VIDEO

Trending Viral Video: हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चांगलेच हैराण झाले असून व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Gangappa Pujari

Girl Eating Soap Viral Video:

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल, ह्याचा काही नेम नाही. सध्या अशाच एका तरुणीचा चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ती चक्क साबण खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चांगलेच चक्रावून गेले आहेत.

सध्या तरुणाईला रिल्स (Reels) आणि सोशल मीडियाचे लागलेले वेड भयंकर आहे. सोशल मीडियावर असंख्य चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. जगावेगळ्या पदार्थांच्या रेसिपी, बेसुमार अन् चित्रविचित्र हावभाव करत खाणारे असंख्य फूड व्लॉगर्सचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

सध्या एका तरुणीच्या व्हिडिओनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. लाईव्ह व्हिडिओमध्ये ही तरुणी चक्क अंघोळीचा साबण खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चांगलेच हैराण झाले असून व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओमधील (Viral Video) तरुणीच्या एका हातात साबण आहे तर दुसऱ्या हातात हॅंडवॉश आहे. लाईव्ह शूट करत असतानाच ती अचानक मला साबण खायला खूप आवडतो म्हणते आणि हॅंडवॉशचा वास घेते. पुढच्याच क्षणी ती बघता बघता हातातला सगळा साबण खाऊन टाकते.

साबण खाल्ल्यानंतर तरुणीला कोणताही त्रास होत नाही किंवा खातानाही तिला काहीच विचित्र वाटत नाही. अगदी आरामात, आवडीने ती हातातला साबण संपवून टाकते. व्हिडिओ पाहून नेटकरी मात्र हैराण झाले असून एखादी व्यक्ती साबण कशी काय खाऊ शकते? असाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.

नेमकी भानगड काय?

साबण खाणाऱ्या या व्हायरल व्हिडिओमागील सत्य मात्र वेगळेच आहे, जे ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. वास्तविक व्हिडिओमघ्ये ज्याला आपण साबण समजतो तो खरा साबण नसून साबणासारखा दिसणारा केक आहे. या तरुणीने व्हिडिओच्या शेवटी याबाबतचा खुलासा केला आहे.

व्हिडिओच्या शेवटी ती हातातला केकही कापताना दिसत आहे. ज्यावरुन तो साबण नसू चॉकलेटी केक असल्याचे लक्षात येते. तरुणीच्या या भन्नाट प्रॅंकला नेटकऱ्यांनी मात्र भरभरुन दाद दिली आहे. तिच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलेला दिसत आहे. (Latest Viral Video )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

Maharashtra Tourism : हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील 'हे' जुळे किल्ले बेस्ट, आताच ट्रिप प्लान करा

HBD Juhi Chawla : चित्रपटांपासून दूर असलेली जूही चावला आहे गडगंज श्रीमंत, संपत्ती आकडा वाचून धक्का बसेल

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! २ तासांचा प्रवास फक्त १० मिनिटात, ३९०० कोटींचा प्रोजेक्ट, वाचा सरकारचा मास्टर प्लॅन!

Shocking : पुणे हादरलं! लग्नाचे आमिष दाखवून २ तरुणींवर बलात्कार

SCROLL FOR NEXT