Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रवाशाचा भन्नाट देसी जुगाड! खचाखच भरलेल्या ट्रेनमधील बाथरूमपर्यंत जाण्यासाठी निवडला भलताच मार्ग; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..

Deshi Jugad Video: सध्या ट्रेनमधील एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ट्रेनमधीस गर्दीतून बाथरुमपर्यंत जाण्यासाठी एका प्रवाशाने भन्नाट मार्ग निवडला आहे.

Tanvi Pol

Viral Video: महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून लाखोच्या संख्येने भाविक रेल्वेतून प्रवास करत आहेत.महाकुंभ मेळ्यात जाण्यासाठी विशेष ट्रेनही सोडल्या जात आहे.रेल्वेची संख्या जरी वाढवली तरी महाकुंभ मेळ्यात जाण्यासाठी प्रवाशांची ट्रेनमधील गर्दी काही केल्या कमी होत नाही.प्रवाशांना अगदी जीव मुठीत घेऊन प्रवास करत जावे लागते आहे.अशाच सध्या या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात प्रवाशांनी गर्दीतून एका व्यक्तीने ट्रेनमधून वाट काढत बाथरुमपर्यंत गेलेला आहे.

सोशल मीडियावर प्रवाशांच्या गर्दीने भरलेल्या ट्रेनमधील(Train) अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे.बऱ्याचदा काही व्हायरल व्हिडिओमध्ये चक्क प्रवाशांनी भरलेल्या खचाखच गर्दीत काही प्रवाशी झोपण्यासाठी हटके जुगाड शोधतात तर काहींजण भन्नाट शक्कल करतात.मात्र सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पंसतीस आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला,ट्रेनमध्ये प्रवाशांची खचाखच गर्दी दिसत आहे.हैराण करणारी गोष्ट म्हणजे काही प्रवाशांना साध ट्रेनमध्ये दोन पायांवर उभं राहण्यासाठीही जागा नाही.दरम्यान ट्रेनमधील एका प्रवाशाला खाली उतरुन व्यवस्थित चालत जाणे शक्य नसते.त्यामुळे तो ट्रेनमधील सीटच्या वरच्या मजल्यावरुन सीटवरुन एक एक पाय ठेवत पुढे सरकत असताना दिसत आहे आणि खाली प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

सर्व व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील 'dixitabhiofficial'या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट होताच हजारो संख्येने असलेल्या नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक केलेले आहे तर अनेकांनी बऱ्याच गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेट केली आहे,''आमच्या गावातील माकडं पण असच वाट काढत जातात'' तर दुसऱ्या एका यूजने कमेट केली आहे,''देवा काय हे चालू'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : प्रवाशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT