Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: डान्स करताना स्टेजवरच कोसळला; विधानसभेत घडली धक्कादायक घटना; VIDEO

केरळ विधानसभेत ओणम साजरा करताना हृदयद्रावक घटना घडली. नृत्य सादर करताना एक कर्मचारी अचानक कोसळला. तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यावर त्याचा मृत्यू झाला.

Manasvi Choudhary

केरळमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. केरळमध्ये विधानसभेतील एका कार्यक्रमादरम्यान एका कर्मचाऱ्याचा मृत्य़ू झाला. ओणम सणासानिमित्त स्टेजवर नृत्य सादर करताना ही घटना घडली आहे. ज्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. या कर्मचाऱ्याला तात्काळ हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता मृत्यू झाला आहे.

ओणम उत्सव हा केरळमधील महत्वाचा आहे. केरळमधील सांस्कृतिक महत्व या सणाला आहे. विधानसभेत हा उत्सव दरवर्षी साजरा होतो. मात्र यंदा विधानसभेत ओणम सण साजरा होण्याला गालबोट लागले आहे. या सणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका व्यक्तीचा मृत्य़ू झाला आहे. स्टेजवर नृत्य सादर करताना अचानक खाली पडला आणि त्यातच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हा ४५ वर्षाचा आहे. विधानसभेत तो सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम करत होता. यापूर्वी ते माजी आमदार पीव्ही अन्वर यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करत होता.

ही घटना काही पहिलीच नाही, याआधी देखील अश्या घटना घडल्या आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी स्टेजवर भगवान शंकराची भूमिका साकारलेला व्यक्ती अचानक खाली पडला आणि त्याचा देखील मृत्यू झाला. अचानक ओढवलेल्या या मृत्यूमुळे हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT