Tractor Accident Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Tractor Accident Viral Video: ट्रॅक्टरच्या स्टंटबाजीने घेतला जीव! पलटी झाला अन् चालक चिरडला; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Tractor Uttar Pradesh Accident Viral Video: ट्रॅक्टर कंंपनीने ग्राहकांसाठी गावामध्ये डेपो प्रचाराचे आयोजन केले होते; यावेळी हा भीषण अपघात झाला....

Gangappa Pujari

Meerut Tractor Accident Viral Video: अलिकडच्या काळात वाहनांवर जीवघेणे स्टंट करण्याची नवीन क्रेझ निर्माण झाली आहे. चालू वाहनांवर हात सोडणे, वेगात गाड्या पळवणे असे अनेक प्रकार करताना अनेकजण पाहायला मिळतात. मात्र असे स्टंट अनेकदा जीवघेणे ठरु शकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये ट्रॅक्टरचा स्टंट चालकाला महागात पडला असून त्याचा जागीच जीव गेल्याची घटना घडली आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागची कथा सविस्तर जाणून घेवूया....

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून अनेकदा आपल्या अंगावर काट उभा राहतो तर कधी आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण ट्रॅक्टरवर बसून जीवघेणे स्टंट करताना पाहायला मिळत आहे.

मात्र हेच जीवघेणे स्टंट त्याच्या मृत्यूचे कारण बनले असून पुढच्याच क्षणी असं काही घडतं की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. या भयंकर अपघाताच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

ट्रॅक्टरचा स्टंट जीवावर बेतला...

समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठ येथील किठौर गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्रॅक्टर कंंपनीने ग्राहकांसाठी गावामध्ये डेपो प्रचाराचे आयोजन केले होते. यावेळी स्टंट करताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट पलटी झाला. ज्याखाली चालक चिरडला गेला.

या दुर्घटनेनंतर (Accident) त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अजय कुमार असे या मृत तरुणाचे नाव असून तो गावातील प्रमुख असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात गावावर शोककळा पसरली आहे. (New Viral Video)

या भयंकर अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संमिक्ष प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी असे स्टंट करायचेच कशाला असे म्हणत चालकावर निशाणा साधला आहे. तर काही जणांनी ट्रॅक्टर कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या कंपनीनेही तरुणाच्या कुटूंबीयांना भरपाई देण्याचे कबुल केल्याचे सांगण्यात येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; उसाला प्रतिटन 4200 रुपये दर मिळणार

सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांना शह? 'गोकुळ'नंतर जिल्हा बँकेतही भाजपची तिरकी चालl; माजी खासदाराला गळाला लावण्याचे प्रयत्न

Political News: राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयंकर कृत्य, महापालिका आवारात महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला अन्...

SCROLL FOR NEXT