Manager Sick leave Policy Viral Saam Tv
व्हायरल न्यूज

Sick leave Policy Viral: सीक लिव्हसाठी 7 दिवस आधी कळवावं लागेल; सुट्टीच्या मेसेजवर बॉसचं उत्तर चक्रावणारं, चॅटिंग व्हायरल

Manager Sick leave Policy Viral: सोशल मीडियावर सध्या एका चॅटिंगचा स्क्रीनशॉट तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक कर्मचारी आजारी पडल्यावर त्याच्या बॉसकडे सुट्टी मागतो. मात्र या कर्मचारीला बॉसने जे उत्तर दिलं, ये जाणून तुम्हाला धक्काच बसेल.

Satish Kengar

ऑफिस किंवा इतर कोणत्याही ठिकाणी प्रत्येक काम करणारी व्यक्ती कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने रजा घेते. कधीकधी असे होते की, आजारपणामुळे काही लोक अचानक सिक लिव्ह घेतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक प्रकार व्हायरल होत आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल.

सोशल मीडियावर सध्या एका चॅटिंगचा स्क्रीनशॉट तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक कर्मचारी आजारी पडल्यावर त्याच्या बॉसकडे सुट्टी मागतो. मात्र या कर्मचारीला बॉसने जे उत्तर दिलं, ये जाणून तुम्हाला धक्काच बसेल.

कोणती व्यक्ती कधी आजारी पडेल, याची भविष्यवाणी कोणीही करू शकत नाही. यातच या कर्मचाऱ्याने आजारी पडल्यावर बॉसकडे सुट्टी मागतिली तर त्याच्या बॉसने त्याला विचारले की, तू सात दिवसआधी का नाही कळवलं?

आता या कर्मचाऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर त्याच्या बॉससोबत व्हॉट्सॲप चॅटिंगचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. सिक लिव्हसाठी सात दिवस अगोदर सुट्टी अप्लाय करण्याची कंपनीची ही पॉलिसी व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी यावर मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

Reddit वर शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे की, कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला कळवले आहे की, "माझी तब्येत बरी नसल्याने मी ऑफिसला येऊ शकणार नाही." त्यावर बॉस विचारतो की, तर आज सिक लिव्ह घेशील का? यावर कर्मचारी उत्तर देतो, होय. यानंतर बॉसने उत्तर दिले, सीक लीव्ह किंवा कॅज्युअल लीव्ह घेण्यासाठी तुला किमान 7 दिवस अगोदर कळवावे लागेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT