Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धूम स्टाईलने पळवले दागिने! वृद्धाचा पाठलाग करत ४० तोळ्यांचे सोनं लंपास; घटना CCTV मध्ये कैद

Sangli Robbery Video: सोशल मीडियावर सध्या सांगलीमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घडलेली घटना इतकी भयंकर आहे की,प्रत्येकजण हादरले आहेत. नक्की काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Elderly Man Robbed: शहराच्या मध्यवर्ती भागात भरदिवसा धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. जिथे एका वृद्धाकडील तब्बल ४० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी धूम स्टाईलने लंपास केली. विशेष म्हणजे, ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामुळे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली आहे.

नेमके घडले तरी काय?

घडले असे की, वृद्ध व्यक्ती त्यांच्यात ४० तोळे सोन्याचे दागिने पतसंस्थेमधील लॉकरमध्ये ठेवण्यासाठी निघाले होते. दरम्यान वृद्धाचा पाठलाग करत दुचाकीवरून आलेल्या दोघां अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केली आहे आणि घटना स्थळावरुन पळ काढलेला आहे. सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही (Cctv) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या चोरीची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे आणि दिवसाढवळ्या अशा प्रकारे चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्व घटनेचा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक चोरीच्या घटनांचे व्हिडिो व्हायरल झाले आणि ते पाहून प्रत्येकजण हैराण होतो. त्यातही सध्याचा व्हिडिओही असाच आहे. लोकांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT