Thar Car Accident Saam Tv
व्हायरल न्यूज

Thar Car Accident: महिलेने नवी कोरी थार घेतली, लिंबूवरून नेली अन् घडलं भयंकर, VIDEO होतोय व्हायरल

Thar Car Accident Viral Video: दिल्लीतील शोरूममध्ये नवीकोरी थार कार डिलीव्हरीदरम्यान अपघात झाला. लिंबू रिवाज करताना कार थेट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली. कारचे मोठे नुकसान झाले असले तरी जीवितहानी टळली.

Manasvi Choudhary

आपल्याकडे कोणतीही नवीन वस्तू घेतली की त्याची पूजा केली जाते. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर तिची देखील ओवाळणी केली जाते. नवीन कार खरेदी केल्यानंतर पहिल्यांदा लिंबूवरून नेण्याची पद्धत आहे. आजदेखील नवीन कार खरेदी केल्यानंतर अनेकजण ही पद्धत करतात. नुकताच नवी कोरी कार खरेदी केल्यानंतर लिंबूवरून नेताना मोठा अपघात झाला आहे. ज्यामध्ये थार कारचा चक्काचूर झाला आहे.

नवी कोरी थार रॉक्स शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून थेट १५ फूट खाली जमिनीवर पडली आहे. प्रत्यक्षात म्हणजे शोरूमच्या पहिल्या मजल्यावर असलेली नवीकोरी थार रॉक्स कारची डिलीव्हरी होत होती. याचदरम्यान हा प्रकार घडला आहे. शोरूमच्या पहिल्या मजल्यावरू थार कार थेट खाली जमिनीवर पडली आहे.

.

एका महिलेने नवीकोरी थार रॉक्स खरेदी केली होती. कारची डिलीव्हरी होत होती. शोरूममधील सेल्समनने कारचे सर्व फिचर्स समजावून सांगितले. यानंतर कारची पूजा सुरू झाली. यावेळी कार लिंबूवरून न्यायची होती. यासाठी हलका एस्केलेटर दाबायचा होता पण महिलेने चुकून इतक्या जोरात एस्केलेटर दाबला की कार वेगाने पुढे गेली आणि थेट शोरूमची काच तोडून खाली कोसळली आहे. कार थेट शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली आहे.

महिलेसोबत कारमध्ये तिचा पती आणि शोरूम सेल्समन देखील होता. या कार अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाली असल्याची माहिती आहे. ही घटना दिल्लीतील आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये शोरूमच्या खालच्या मजल्यावर ही कार उलटी स्थितीत दिसत आहे. सर्वत्र फुटलेल्या काचा दिसत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट

Maharashtra Politics: शिवसेनेत अंतर्गत धुसफूसीचा स्फोट; शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ZP Election : २२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार, शिवसेनेकडून १२ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Hemant Dhome: मराठी सक्ती विरोधातील आंदोलनावरून प्रसिद्ध अभिनेता भडकला; परप्रांतीय रिक्षाचालकांना दिला मोठा इशारा

Mansi Naik Dance Video: 'मेरे सपनो के राजा' गाण्यावर मानसी नाईकने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT