Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: मेट्रोच्या कामावेळी ठाण्यात भीषण दुर्घटना! क्रेन थेट कारवर कोसळली

Thane Viral News: ठाणे जिल्ह्यातील घडलेल्या एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओत तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ ठाणे शहरातील मध्यवर्ती भागातील आहे. जिथे दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते.

Tanvi Pol

Crane Collapses on Car: ठाण्यातील मेट्रोच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली असून, एका क्रेनचा समतोल बिघडल्याने ती थेट रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर कोसळली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला दुदैवाने चारचाकी चालकाचे कुटुंबीय वाचले आहे. या घटनेने घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.

नेमके घडले कधी?

रमेश म्हात्रे नावाचा व्यक्ती ठाण्याहून घोडबंदर वरून भाईंदरच्या दिशेने जात होते. ठाण्यात मेट्रो चारचं कापूरबावडी जंक्शनचे काम सुरू होते. दरम्यान क्रेनचा काही भाग कारवर कोसळला. या दुर्घटनेत (Shocking Video) कार चालकाचं कुटुंब थोडक्यात बचावलंय. मात्र, या घटनेनंतर मेट्रोच्या कामामुळे आता वाहन चाकल सुरक्षित नाहीत का असा सवाल उपस्थित झालाय.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतू या दुर्घटनेनंचक स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला गेला आहे. मेट्रो कामात सुरक्षिततेच्या उपाययोजना योग्यरीत्या केल्या जात नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. हा व्हिडिओ गेल्या काही तासांपासून तुफान व्हायरलही होत आहे.

ब्रिजवरून गाडी कोसळली, एकाचवेळी दोन अपघात

ठाणे शहरातील या अपघाताची घटना ताजी असताना सोशल मीडियावर काही तासांपूर्वी घडलेल्या अपघाताची(Accident) चर्चा जोरदार होत आहे. ज्या घटनेत एका अपघाताचे बचावकार्य सुरु असतानाच त्याचवेळी ब्रिजवरून दुसरी गाडी कोसळली होती.

टीप: हा अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT