Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: जाळ अन् धूर संगटच! विद्यार्थ्यांसमोर मॅडमचा जबरदस्त डान्स; भुरळ घालणारा व्हिडिओ व्हायरल

Teacher Dance Viral Video: या मॅडमसोबत शाळेतली एक विद्यार्थिनी देखील डान्स करतेय. तर बाकीचे विद्यार्थी त्यांच्या भोवती घोळका करून उभे आहेत. हा डान्स फक्त मुलींचा असावा असं व्हिडीओ पाहून

साम टिव्ही ब्युरो

Viral Video:

हिवाळा सुरू होताच शाळेमध्ये विविध ॲक्टिवीटी सुरू होतात. स्पोर्ट्स आणि डान्सची स्पर्धा याच दिवसांत होते. तुम्ही देखील शाळेत डान्समध्ये अनेकदा सहभाग घेतला असेल. अशात सोशल मीडियावर एका मॅडमच्या डान्सचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ पाहून तुम्ही देखील या बाईंच्या प्रेमात पडाल. शाळेत डान्स स्पर्धा सुरू असताना सर्वच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना डान्सच्या विविध स्टेप्स शिकवतात. आता देखील या मॅडमने दम दम मस्त है या बॉलिवूड गाण्यावर आपल्या विद्यार्थ्यांना सुंदर स्टेप्स शिकवल्यात. यावेळी त्यांनी एक सिंपल साडी परिधान केली आहे.

या मॅडमसोबत शाळेतली एक विद्यार्थिनी देखील डान्स करतेय. तर बाकीचे विद्यार्थी त्यांच्या भोवती घोळका करून उभे आहेत. हा डान्स फक्त मुलींचा असावा असं व्हिडीओ पाहून वाटत आहे. कारण मॅडम आणि विद्यार्थिनीच्या मागे काही मुली एका पोजमध्ये उभ्या आहेत. @mini.26 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.

सुरुवातीला व्हिडीओ पाहून मॅडम वाटणारी ही महिला खरंतर एक कोरिओग्राफर आहे. या महिलेचे इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक व्हिडीओ आहेत. तसेच बायोमध्ये आपण कोरिओग्राफी, व्हिडीओ क्रियेटर असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. असं असलं तरी सध्या व्हायरल झालेला व्हिडीओपाहून अनेकांनी या महिलेला शाळेत शिकवणाऱ्या मॅडम असल्याचं समजलं आहे.

सोशल मीडियावर डान्स आणि गाण्याचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात कधी लहान मुलं सुंदर नृत्य सादर करतात तर कधी हळदी आणि लग्नातील मौज मजेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT