Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अबब! बाळाचा जीव धोक्यात टाकणारा स्टंट; दुचाकीवर प्रवास करताना पिशवीत ठेवलं बाळ, नेटकऱ्यांचा संताप

Viral Video: व्हिडिओमध्ये धोकादायक स्टंट करताना एका मुलाचा जीव संकटात घालण्यात आल्याचे दिसते. नेटिझन्सनी या बेपर्वा कृत्याचा तीव्र निषेध करत संताप आणि चिंता व्यक्त केली आहे.

Dhanshri Shintre

लहान मुलांची सुरक्षा ही प्रत्येक पालकाची प्राथमिक जबाबदारी आहे, पण सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे काहीजण बेजबाबदार वर्तन करत असल्याचे दिसत आहे. व्हायरल होण्याच्या नादात काही लोक मुलांच्या जीवाशी खेळत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये एका लहान बाळाला धोकादायक परिस्थितीत ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा कृत्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. केवळ व्हिडिओसाठी मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे किती गंभीर ठरू शकते, याचा विचार समाजाने करण्याची गरज आहे. पालकांनी अशा प्रकारांपासून सावध राहावे, असे आवाहन केले जात आहे.

व्हिडिओमध्ये ही व्यक्ती दुचाकीवर प्रवास करताना दिसत आहे, ज्याच्या हँडलला एक पिशवी लावलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पिशवीत एक लहान बाळ ठेवलेले आहे. जरी पिशवी दोरीने बांधलेली असली, तरी हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. जर पिशवी फाटली किंवा कोणत्याही गोष्टीची धडक बसली, तर बाळाचा जीव गंभीर संकटात येऊ शकतो. हा बेजबाबदार प्रकार पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा कृतींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

इन्स्टाग्रामवरील 'theindiansarcasm' या अकाऊंटवर पोस्ट झालेल्या एका या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी रोष व्यक्त करत कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, हे खूप धोकादायक आहे, कोणी असे कसे करू शकतो? तर दुसऱ्याने चेतावणी दिली, अत्यंत धोकादायक! असे करू नका. तिसऱ्याने लिहिले, लहान मुलांची साधी दुखापतही सहन होत नाही, ही काय मस्करी करण्यासारखी गोष्ट आहे? नेटकऱ्यांनी अशा बेजबाबदार कृतींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात गंभीर कारणे

धक्कादायक ! प्रसुतीसाठी गेलेल्या महिलेचं नवजात बाळ जमिनीवर पडलं, रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप, VIDEO

मखमली सूर थांबले... ज्येष्ठ गायिकेचं निधन, संगीत क्षेत्रात शोककळा

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: :- डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला

SCROLL FOR NEXT