Students River Crossing: शिक्षण हे प्रत्येकाचा हक्क आहे, असं आपण नेहमी म्हणतो. पण प्रत्यक्षात देशाच्या अनेक भागांत अजूनही शिक्षणाची वाट ही काटेरी, धोकादायक आणि जीवावर उदार होणारी आहे. अशाच एका ठिकाणचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थी वाहत्या नदीतून दोरीला लटकत किंवा पाण्यातून चिखलात पाय रुतवत शाळेच्या दिशेने जात असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल, इतका तो धक्कादायक आहे.
या विद्यार्थ्यांना दररोज सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडताना केवळ दप्तर आणि डबा घेऊन निघावं लागत नाही शिवाय त्यांच्या बरोबर हिम्मत, धाडस आणि जिद्दही घेऊन जावं लागतं. शाळा(School) त्यांच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर असून त्या शाळेकडे जाणारा मार्ग एक वाहत्या नदीतून जातो. कोणतीही पूल किंवा पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्यांना हा जीवघेणा मार्ग निवडावा लागतो.
सध्या हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरला असून तो इन्स्टाग्राम, एक्स(ट्विटर) आणि फेसबुक अशा प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी पाहिला आहे. सर्वात जास्त हा व्हिडिओ एक्सवरील @bhardwaj2509 या अकाउंटवर पाहिला असून यावरच अपलोड करण्यात आलेला आहे.
हा व्हिडीओ(Video) समोर येताच अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलं की,''विद्यार्थ्यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे'', तर अनेकांनी ''सरकारवर टीका केली आहे''. एका यूजरने म्हटलं की,'' हे बघून रडू येतं'' अशा असंख्य भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. काहींनी तर अशा ठिकाणी तात्काळ पूल बांधण्याची मागणी केली आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.