Street Food Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Street Food Viral Video: जबरदस्त! पराठा हवेत गरगर फिरला, अन् तव्यावर फिरला; हटके VIDEO समोर

Street Cheif Paratha Video: फूड ब्लॉगिंगशी संबंधित व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. पराठे बनविणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरत आहे.

Rohini Gudaghe

Viral Video News

आपल्या देशात टॅलेंटेड लोकांची कमी नाही. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळं टॅलेंट बघायला मिळतं. त्यांच्यातील कौशल्याचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत (Street Cheif Paratha Video) असतात. फूड ब्लॉगिंगशी संबंधित व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. यातील बरेच व्हिडिओ गमतीशीर असतात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. (Latest Marathi News)

खरं तर पराठे बनविणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरत आहे. यामध्ये त्या व्यक्तीचं पराठे बनविण्याचं अनोखं कौशल्य दिसत आहे. त्याची पराठे बनविण्याची अनोखी शैली सध्या लोकप्रिय होत (Street Food Viral Video) आहे. अनेकजण या व्यक्तीचं कौतुक करत आहे. अतिशय हटके पद्धतीने हा व्यक्ती पराठे बनवत आहे. त्यामुळे तो चांगलाच व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये दिसतंय की, स्ट्रीट शेफ प्रथम लाटून पराठा तयार करतो. नंतर तो पराठा थेट तव्यावर ठेवत नाही. तवा त्याच्यापासून दूर असतो, शेफ स्वत:च्या जागेवरून तव्यावर पराठा (Viral Video) फेकतो. यानंतर, दुसरा व्यक्ती पराठा पकडतो आणि तव्यावर भाजतो. पराठा बनवण्याची ही स्टाईल तुम्ही कदाचित याआधी कधीच पाहिली नसेल.

व्हिडिओ कॅप्शननुसार, हा व्हिडिओ दिल्लीतील आहे. सफदरजंग हॉस्पिटलच्या गेट क्रमांक 6 जवळच्या “फ्लाइंग पराठा” नावाच्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलचा हा व्हिडिओ आहे.

ही क्लिप X वर @desimojito नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. कमेंट करून अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलंय (Viral News) की, 'तो अशोक डिंडापेक्षा चांगला फेकतो.' तर दुसऱ्याने लिहिले की, 'या व्यक्तीची प्रतिभा खरोखरच अप्रतिम आहे.' याशिवाय इतर अनेक युजर्सही कमेंट करून आपापली प्रतिक्रिया देत आहेत.

फूड ब्लॉगिंगशी संबंधित व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. पण दिल्लीत पराठे बनविणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT