Snake Rain : आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो.आता दावा करण्यात आलाय की आकाशातून सापांचा पाऊस पडतोय. पण, खरंच आकाशातून सापांचा पाऊस पडलाय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असून, दावा करण्यात आलाय की आकाशातून सापांचा पाऊस पडतोय आणि हे निसर्गाशी छेडछाड केल्याचा परिणाम आहे. यामुळे अनेकांना विश्वास बसलाय पण, खरंच सापांच्या पावसाचा हा व्हिडिओ खऱा आहे का? याआधी कधीही आपण सापांचा पाऊस पडतो हे पाहिलेलं नाही पण, आता हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांनी याबद्दल पोस्ट केल्यायत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाण्याऐवजी मोठ्या संख्येने साप आकाशातून खाली पडताना दिसत आहेत. लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसतायत. यामुळे घबराट पसरलीय. आकाशातून सापांचा पाऊस पडत असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओंची आम्ही पडताळणी केली. आम्ही त्याचे कीफ्रेम्स गूगल लेन्सवर शोधले.
आम्हाला व्हिडिओशी संबंधित कोणताही विश्वसनीय अहवाल आढळला नाही. खरोखरच कोणत्याही देशात सापांचा पाऊस पडला असता, तर ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये एक मोठी बातमी बनली असती. या व्हिडिओत जमिनीवर सरपटणाऱ्या आणि वरून खाली पडणाऱ्या सापांची हालचाल खूपच अनैसर्गिक आहे. ते खाली पडण्याऐवजी हवेत तरंगत असल्याचे दिसतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
आकाशातून कधीही सापांचा पाऊस पडत नाही
व्हिडिओतील सापांची हालचाल खूपच अनैसर्गिक
सापांचा पावसाचा व्हायरल व्हिडिओ AI निर्मित
असे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकजण पुढे फॉरवर्ड करतात. आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात. मात्र, आमच्या पडताळणीत उत्तर भारतात सापांचा पाऊस पडत असल्याचा दावा असत्य ठरलाय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.