Snake Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Snake Viral Video : भांड्यांच्या मांडणीत फणा काढून बसला साप; काळजात धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Snake Found In Steel Plate Rack : एका घरात भलामोठा नाग थेट घरातील भांड्यांच्या मांडणीत जाऊन बसला आहे. मांडणीतून हा साप मोठा फणा काढत आहे.

Ruchika Jadhav

सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी सरपटणारे प्राणी बाहेर पडतात. त्यामुळे मानवी वस्तीत सुद्धा साप किंवा सापसुरळी असे प्राणी आढळतात. साप किंवा नाग असं नाव ऐकलं काळजातली धडधड वाढते. अशात सोशल मीडियावर विविध ठिकाणी साप आढळल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता देखील एका नागाचा असाच भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.

घरामध्ये जमिनीवर आणि विविध ठिकाणी साप किंवा नाग आढळतात. त्यात कर्नाटकातील एका घरात भलामोठा नाग थेट घरातील भांड्यांच्या मांडणीत जाऊन बसला आहे. मांडणीतून हा साप मोठा फणा काढत आहे. या घरातील व्यक्तींना एवढा मोठा नाग आणि तो देखील मांडणीत बसल्याचं पाहून मोठा धक्काच बसला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मांडणीमध्ये ताट ठेवण्यासाठी असलेल्या जागेवर या नागाने वेटोळे घातले आहे. तसेच या मांडणीतून फणा बाहेर काढत तो उपस्थितांना दंश करण्याचा प्रयत्न करतोय. नाग पकडण्यासाठी सर्पमीत्र येथे दाखल झालेत. त्यांच्याकडून नागाला सुखरूप पकडण्याचे प्रयत्न केले जातायत.

ब्लॅक रंगाचे कापड आणि स्टीकच्या सहाय्याने नाग पकडण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले जातात. त्यानंतर नाग पकडण्यात सर्पमीत्राला यश येतं. नाग पकडल्यानंतर त्याला निसर्गअधिवासात सोडण्यात आलं आहे. मात्र हे दृश्य खरोखरच काळजात धडकी भरवणारं आहे.

सोशल मीडियावर @snakemaniac_joju या इंस्टाग्राम चायनलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्हुव्ज आलेत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

SCROLL FOR NEXT