ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गावी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील साप मानवी वस्तीत आल्याचे पाहायला मिळतात.
कधी कधी अगदी घरामध्ये देखील साप आढळतात.
नागदवणा हे झाड घराजवळ लावावे, याने साप घराच्या आजूबाजूलाही फिरकत नाही.
साप घरात येऊनये म्हणून परदेशात स्नेक प्लांटचा वापर केला जातो.
अनेक ठिकाणी घराबाहेरच झेंडूच्या फुलांची शेती केली जाते. याच्या गंधाने साप तेथे येत नाही.
तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. घराजवळ साप येऊ नये यासाठी तुम्ही देखील ही वनस्पती अंगनात लावू शकता.
निवडुंगाला काटे असतात. त्यामुळे हे झाड देखील घराजवळ लावल्यास साप तेथे फिरकत सुद्धा नाही.