Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एअर होस्टेस बहिणीचं क्रू मेंबर भावाला भन्नाट सरप्राईज; लाखो यूजर्स VIDEO पाहून झाले इमोशनल

Sister Surprise Brother In Flight: भाऊ बहिणीचं नातं हे जगातील सर्वात प्रेमळ नातं आहे. असंच भावाबहिणीचं प्रेम दाखवणारा एक विमानातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Rohini Gudaghe

Indigo Flight Viral Video

भाऊ आणि बहिणीचं नातं हे जगातील सर्वात गोड नातं आहे. आपापसात कितीही भांडण झालं, तरी ते एकमेकांवर सर्वात जास्त प्रेम करतात. दोघेही एकमेकांच्या यशात सर्वाधिक आनंदी होतात. साधारणत: एकाच कंपनीत भाऊ-बहिण एकत्र काम (Sister Surprise Brother In Flight) करतात, असं क्वचितच घडतं. पण, नुकतंच इंडिगो एअरलाइन्समध्ये अशी घटना घडली आहे. (Latest Viral News)

इंडिगो एअरलाईन्समध्ये (Indigo Flight) रिया नावाची एक महिला काम करत होती. रिया इंडिगो एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस आहे. तिचा भाऊ हर्ष त्याच एअरलाईन्समध्ये ग्राउंड क्रू म्हणून रुजू झाला आहे. तेव्हा ती अतिशय आनंदी झाली. एअर होस्टेस बहिणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने भावासाठी कामाच्या पहिल्याच दिवशी एक सरप्राईज प्लॅन केलं होतंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंडिगो एअरलाइन्समधील घटना

इंडिगोमध्ये काम करणाऱ्या रियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर (Indigo Flight Viral Video) केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा भाऊ हर्षला सरप्राईज करताना दिसत आहे. रियाने फ्लाइटमध्ये तिच्या भावाच्या यशाचा आनंद साजरा केला आहे. त्याच्यासाठी तिने अभिनंदनाची पोस्ट शेअर केली आहे.

हा व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर @capri.hostie या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसतंय की, रियाचा भाऊ हर्ष फ्लाइटमध्ये प्रवेश करताच, तिने आनंदाने त्याला मिठी मारली. सेलिब्रेशनसाठी केक, चॉकलेट आणि नोटही ठेवली आहे. व्हिडिओ शेअर करताना रियाने कॅप्शनमध्ये लिहिले (Sister Surprise Brother) आहे की, मला माझ्या धाकट्या भावाचा खूप अभिमान आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, अभिनंदन. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आतापर्यंत 2 लाख 57 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. यावरून तो किती व्हायरल होत आहे, याची कल्पना येऊ शकते. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या (Viral News) आहेत. लोक या भाऊ-बहिणीच्या जोडीचं कौतुक करत आहेत. अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये सुंदर, अभिमानास्पद क्षण, हार्ट इमोजी अशा कमेंट्सही केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT