Shocking Vide0 Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: गजराज रागावले! हत्ती पाठी लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची 'भागम भाग'

Elephant Attack Video: कर्नाटकमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका हत्तीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय.

Tanvi Pol

Karnataka Shocking Video: कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यातच अलीकडेच घडलेल्या एका थरारक घटनेत, एका जंगली हत्तीने वन कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला केला, ज्यामुळे त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला सर्वत्र वन विभाग दिसत आहे. अतिशय घनदाट आणि उंच झाडी व्हिडिओत दिसून येत आहे. त्यात एक भलामोठा हत्ती वाऱ्याच्या वेगाने दोन व्यक्तींच्या दिशेने पळत येत आहे. मात्र ते दोघही जीव वाचवण्यासाठी जोरदार पळत आहेत. शेवटी वन विभागाचे कर्मचारी हत्तीच्या हल्ल्यापासून वाचण्यात यशस्वी होऊन जातात.

ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @RohitNandanMis3 या एक्स अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक लाईक्स मिळाले असून लाखोंच्या संख्येने व्ह्यूज ही मिळालेले आहे.

ऐवढेच नाही तर व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील काही यूजर्संनी म्हटले आहे,''अतिशय भयानक घटना आहे'' तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत.

टीप: कर्नाटकमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT